ॲग्रो गाईड

Plastic Mulching Types : प्लॅस्टिक आच्छादनाचे विविध प्रकार कोणते आहेत?

अच्छादनाच्या वापरामुळे २५ ते ३० टक्के पर्यंत पाण्याची बचत होते. पीक आणि फळबाग लागवडीमध्ये आच्छादनासाठी पी. व्ही. सी, एल. डी. पी. ई या प्रकारच्या फिल्मचा उपयोग करता येतो.

Team Agrowon

पाण्याची कमतरता असताना पाण्याची बचत करण्यासाठीचा हमखास उपाय म्हणजे विविध प्रकारच्या आच्छादनाचा (Plastic Mulching) वापर करणे.

अच्छादनाच्या वापरामुळे २५ ते ३० टक्के पर्यंत पाण्याची बचत होते. पीक आणि फळबाग लागवडीमध्ये आच्छादनासाठी पी. व्ही. सी, एल. डी. पी. ई या प्रकारच्या  फिल्मचा उपयोग करता येतो.

अलिकडे एल. डी. पी. ई. (LDPE) पेक्षा एल. एल. डी. पी. ई. (LLDPE) प्लॅस्टिक फिल्म आच्छादनासाठी (Plastic Mulching) वापरली जाते. याचे वापरण्याचे मुख्य कारण म्हणजे अतिशय पातळ आवरण देऊ शकण्याची क्षमता आणि छेदन  प्रतिकारक शक्ती. 

पारदर्शक प्लॅस्टिकचे आच्छादन 

या प्रकारच्या आच्छादनामुळे जमिनीचे तापमान वाढण्यास मदत होते. पारदर्शक आच्छादनामुळे सुर्याची किरणे जमिनीपर्यंत जाऊ शकतात. परंतु जमिन तापल्यानंतर त्यापासून निघणारी ऊर्जा आच्छादनामुळे अडविली जाते. 

काळे प्लॅस्टिकचे आच्छादन

अशा प्रकारच्या आच्छादनामुळे सुर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहचू शकत नाहीत. साहाजिकच त्यामुळे जमिनीचे तापमान वाढण्यासाठी या आच्छादनाचा तितकासा उपयोग हेत नाही. मात्र या प्रकारच्या आच्छादनामुळे तणांचा उपद्रव कमी होतो. 

सुर्यकिरणे परावर्तीत करणारे आच्छादन

या आच्छादनामुळे मावा आणि तुडतुडे यांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.  पांढऱ्या किंवा चंदेरी रंगामुळे सुर्यकिरणे परावर्तीत होऊन पिकाला सर्व बाजूंनी सुर्यप्रकाश मिळू शकतो. त्यामुळे पिकांची जोमदार वाढ होते. 

इन्फ्रारेड प्रकाशास पारदर्शी आच्छादन 

या प्रकारच्या आच्छादनातून सुर्य प्रकाशातील इन्फ्रारेड किरणे जमिनीपर्यंत पोहचू शकतात. मात्र तणांच्या वाढीस उपयुक्त अशी प्रकाश किरणे पोहचू शकत नाहीत. अशा अच्छादनात काळ्या प्लॅस्टिकच्या आच्छादनापेक्षा जमिनीचे तापमान अधिक असते त्याचबरोबर तणांची वाढ रोखली जाते. या प्रकारच्या आच्छादनाचा रंग हिरवा किंवा विटकरी असतो.  

रंगीत प्लॅस्टिक आच्छादने 

वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या रंगाच्या प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर फायदेशिर ठरतो. 

विणलेले सच्छिद्र आच्छादन 

अशा प्रकारचे आच्छादन गादीवाफ्यावर वापरता येते. वर्षानुवर्षे टिकणाऱ्या छोट्या फळझाडांसाठी जसे स्ट्रॉबेरी हे आच्छादन जास्त फायदेशीर ठरते. या आच्छादनाचा वारंवार गुंडाळण्याचा आणि टाकण्याचा खर्च वाचतो. अशा आच्छादनातून हवा पाणी तसेच खते जमिनीपर्यंत जाऊ शकतात परंतू तणांच्या वाढीस हे आच्छादन रोखू शकते. 

स्त्रोत - महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural University Vacancy: कृषी विद्यापीठांत ५७ टक्के जागा रिक्त

PM Suryaghar Yojana: ‘सूर्यघर’चा साडेपंधरा हजार ग्राहकांनी घेतला लाभ

Drip Irrigation Subsidy: ठिबक अनुदानाचे २० हजार अर्ज गायब

Rural Development: शेतकऱ्यांची स्थिती सुधारली तरच भारत प्रगत होईल

Onion Storage Facility: कांदा-लसूण साठवणूक गृहासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT