Ginger Cultivation  Agrowon
ॲग्रो गाईड

Ginger Irrigation Management : आले पिकासाठी ठिबकद्वारे पाणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन

Ginger Production : दर्जेदार उत्पादनासाठी आले पिकास ठिबक सिंचनातून पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे फायदेशीर ठरते. पिकासाठी पाणी, अन्नद्रव्ये कार्यक्षम मुळांच्या कक्षेत दिली गेल्याने पुरेपूर वापर होतो. पाण्यात ५० टक्के आणि खतात ३० टक्के बचत होते.

Team Agrowon

अरुण देशमुख
Ginger Crop : दर्जेदार उत्पादनासाठी आले पिकास ठिबक सिंचनातून पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे फायदेशीर ठरते. पिकासाठी पाणी, अन्नद्रव्ये कार्यक्षम मुळांच्या कक्षेत दिली गेल्याने पुरेपूर वापर होतो. पाण्यात ५० टक्के आणि खतात ३० टक्के बचत होते.

राज्यामध्ये आले पिकाची सरासरी दर एकरी उत्पादकता आणि गुणवत्ता कमी आहे. याची प्रमुख कारणे म्हणजे अयोग्य बेण्याची निवड, पाणी व खतांचे अयोग्य नियोजन, तणनियंत्रणाचा अभाव, रोग, किडींचा प्रादुर्भाव, मायक्रो स्प्रिंकलर वापरातील त्रुटी यांचा प्रामुख्याने समावेश होतो. दर्जेदार उत्पादनासाठी आले पिकास ठिबक सिंचनातून पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे फायदेशीर ठरते.

ठिबक सिंचनामध्ये नळीच्या आतून ड्रीपर असणारी इनलाइन ड्रीप पद्धती वापरावी. शेतात सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पाणी व खते मिळण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक नळीतील अंतर, ड्रीपरमधील अंतर व ड्रीपरचा ताशी प्रवाह असावा.

जमिनीचा प्रकार---हलकी – कमी खोलीची जमीन ---मध्यम खोली ते जास्त खोलीची भारी जमीन
ठिबक नळीतील अंतर---४ ते ४.५ फूट---४.५ ते ५ फूट
ड्रीपर मधील अंतर---३० सेंमी.---४० सेंमी.
ड्रीपरचा ताशी प्रवाह---१ लिटर /तास---२ लिटर /तास

फायदे ः
१) पिकासाठी पाणी, अन्नद्रव्ये कार्यक्षम मुळाच्या कक्षेत दिली गेल्याने त्यांचा पुरेपूर वापर होतो.
२) पाण्यात ५० टक्के आणि खतात ३० टक्के बचत होते.
३) उगवण लवकर होऊन वाढ जोमदार आणि एकसमान होते.
४) वाढीच्या प्रत्येक अवस्थेवर नियंत्रण ठेवता येते.
५) जमिनीतील पाणी, अन्न आणि हवा यांचे संतुलन राखता येते. जमीन कायमस्वरूपी वाफसा स्थितीत ठेवली जाते. यामुळे पाणी व अन्नद्रव्य शोषण कार्यक्षमपणे होते.
६) हवे तेवढेच पाणी मुळांशी दिल्याने बुरशी, तण आणि कीड, रोगांचा प्रादुर्भाव फारच कमी होतो.
७) ठिबक सिंचनाद्वारे पाणी सुरू असतानाही भरणी, फवारणी करता येते.
८) उच्च दर्जाचे उत्पादन मिळते. उत्पादनात ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होते.


ठिबक सिंचनातून पाणी व्यवस्थापन ः
आले हे पीक मुळांशी योग्य तितकाच ओलावा याबाबत खूपच संवेदनशील आहे. प्रमाणापेक्षा जास्त ओलावा झाल्यास कंदकुजीचा प्रश्‍न दिसतो.

पाण्याची गरज काढण्याचे सूत्र ः
पाण्याची गरज (मिमी.) = बाष्पीभवन (मिमी./दिन) × पीक गुणांक × बाष्पपात्र गुणांक
दर एकरी पाण्याची गरज = एकराचे क्षेत्रफळ (चौरस मीटर) × प्रति दिन पाण्याची गरज
उदा. बाष्पीभवन जर ५ मिमी./दिन असेल आणि पीक गुणांक ०.५ आणि बाष्पपात्र गुणांक जर ०.८ धरला तर एकरी पाण्याची गरज (लिटर/दिन) = ५ × ०.५ × ०.८ × ४००० = ८,००० लिटर.

७५ दिवसांनी भरणीच्या वेळी प्रति एकरी द्यावयाची खते
खताचा प्रकार----खते (किलो / एकर)
डीएपी----५०
अमोनिअम सल्फेट ---५०
एसओपी ---५०
सूक्ष्म अन्नद्रव्ये ---१०
निंबोळी पेंड---२००

---------------------------------------------------------------
संपर्क ः अरुण देशमुख, ९५४५४५६९०२
(प्रमुख, कृषी विद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. पुणे)


ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vijay Wadettiwar: शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या: विजय वडेट्टीवार यांची मागणी

Tur Disease Management : तूर पिकावरील करपा, वांझ रोगाचे व्यवस्थापन

Rice Stocks : यंदा तांदळाचा विक्रमी साठा, मोठ्या प्रमाणात निर्यातीची तयारी

Voter Fraud: महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात मते वाढवली, निवडणूक आयोग मत चोरांसाठी काम करते; राहुल गांधी

Vegetable Farming Success : प्रशिक्षणातून भाजीपाला शेतीत तयार केला वार्षिक रोजगार

SCROLL FOR NEXT