Two New Portals
Two New Portals Agrowon
ॲग्रो गाईड

नरेंद्र सिंग तोमर यांच्याहस्ते दोन संकेतस्थळांचे उद्घाटन

Team Agrowon

कृषी क्षेत्रासाठी दोन नवे संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून सोमवारी (दिनांक १८ एप्रिल) केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर (Narendra Singh Tomar) यांच्या हस्ते या दोन्ही संकेतस्थळांचे उदघाटन करण्यात आले.

यातील एक संकेतस्थळ हे कीडनाशकांच्या नोंदणीसंदर्भात तर दुसरे संकेतस्थळ कृषी मालाच्या आयात-निर्यातीसाठी संबंधित कागदपत्रांसंबंधात आहे. कृषी क्षेत्रातील व्यवहार सुलभीकरणासाठी पुसा कॉम्प्लेक्स येथे आयोजित कार्यक्रमात तोमर यांच्या हस्ते क्रॉप (Comprehensive Registration of Pesticides) आणि पीक्यूएमएस (Plant Quarantine Management System) अशा दोन संकेतस्थळांचा उद्घाटन सोहळा पार पडला.

कृषी क्षेत्रातील व्यवहार वेगाने व्हावेत, यासाठी काही सुधारणा करण्याची गरज असेल तर केंद्र सरकार या सुधारणा नक्कीच करेल, असे यावेळी तोमर यांनी सांगितले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील कृषी क्षेत्राच्या योगदानाचा उल्लेख करत तोमर यांनी कृषी क्षेत्रातील सुधारणांची गरज व्यक्त केली.

शेतकऱ्यांचे श्रम, कृषी शास्त्रज्ञांचे संशोधन आणि केंद्र सरकारचे कृषीविकासाला पोषक वातावरण यामुळे भारत आज देशाची खाद्यगरज भागवतोच, शिवाय भारताकडे अतिरिक्त धान्यसाठाही मुबलक असल्याचे तोमर यांनी सांगितले आहे.

कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी सरकारी धोरण, संशोधन प्रकल्पावर भर द्यायला हवी. गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करायला हवेत.त्यासाठी केंद्र आणि राज्यांनीही कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी पुढाकार घ्यायला हवा, असेही तोमर म्हणाले आहेत.

यातील एका संकेतस्थळामुळे कीडनाशकांच्या नोंदणीसाठी लागणारा वेळ वाचणार आहे. तसेच दुसऱ्या संकेतस्थळामुळे कृषी मालाच्या आयात-निर्यातीसाठी आणि वाहतुकीसाठी आवश्यक कागदपत्रांची वेळेवर पूर्तता करणे सुलभ होणार असल्याचे यावेळी कृषी सचिव मनोज आहुजा (Manoj Ahuja) यांनी सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT