Sugarcane Agrowon
ॲग्रो गाईड

Sugarcane : शेतकरी पीक नियोजन : ऊस

प्रशांत चंदोबा यांची दानोळी (ता. शिरोळ,  जि.कोल्हापूर) येथे ४ एकर शेती आहे. त्यापैकी २ एकरवर को ८६०३२ या ऊस वाणाची लागवड आहे.

टीम ॲग्रोवन

प्रशांत चंदोबा यांची दानोळी (ता. शिरोळ, जि.कोल्हापूर) येथे ४ एकर शेती आहे. त्यापैकी २ एकरवर को ८६०३२ या ऊस वाणाची लागवड आहे. अतिरिक्त उत्पादनासाठी उसामध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यासाठी भुईमूग, बीट, सोयाबीन ही पिके निवडली जातात.

व्यवस्थापनातील बाबी

उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये ऊस लागवडीचे नियोजन केले होते. त्यानुसार मागील वर्षी मे महिन्याच्या शेवटी उन्हाळी सोयाबीन काढणीनंतर जमिनीची मशागत केली.

एकरी ५ ट्रॉली शेणखत जमिनीत चांगले मिसळून घेतले. डीएपी १०० किलो, पोटॅश ५० किलो या प्रमाणे रासायनिक खतांचा बेसल डोस दिला.

लागवडीसाठी रोपांचा वापर करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार रोपे तयार करण्यासाठी मी स्वतः बेणे खरेदी करून रोपवाटिका धारकाला आणून दिले. त्यामुळे खात्रीशीर रोपे मिळत असल्याचे श्री. प्रशांत सांगतात. लागवडीसाठी को ८६०३२ या वाणाची निवड केली.

दोन एकर क्षेत्रावर लागवडीसाठी सुमारे ११ हजार ६०० रोपे लागली.

लागवडीसाठी ५ फूट अंतराच्या सऱ्या पाडून त्यात दीड फूट अंतरावर रोप लागवडीचे नियोजन केले. त्यानुसार मजुरांच्या मदतीने जून महिन्याच्या पहिला आठवड्यात रोपांची लागण केली.

संपूर्ण ऊस लागवडीमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. लागवडीनंतर त्वरित ठिबकद्वारे सिंचन केले.

लागवडीनंतर २१ दिवसांनी युरिया व अमोनिअम सल्फेट या रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या.

लागवडीनंतर ६५ दिवसांनी बाळ भरणीच्या वेळी १०ः२६ः२६ हे खत १०० किलो, मॅग्नेशिअम सल्फेट २५ किलो, निंबोळी पेंड ५० किलो प्रमाणे दिले.

लागवडीनंतर ११० दिवसांनी मोठी भरणी केली. त्यावेळी रासायनिक खतांच्या बेसल डोस सोबत १२ः३२ः१६ हे खत १०० किलो, पोटॅश ५० किलो, युरिया खतांच्या मात्रा दिल्या.

साधारण जानेवारी महिन्यात पहाटेच्या वेळी धुके आणि दुपारी कडक ऊन अशी स्थिती होती. त्यामुळे करप्याचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यासाठी शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी घेतली.

आवश्यकतेनुसार पिकांत तणनाशकांची फवारणी आणि मजुरांच्या मदतीने तणनियंत्रण केले.

जमिनीतील वाफसा आणि हवामानाचा अंदाज घेत ठिबकचा कालावधी कमी जास्त केला

जातो.

ऊस लागवडीमध्ये पीक १६० ते १७० झाल्यानंतर जमिनीलगचा वाळलेला पाला काढून टाकला. त्यामुळे तण नियंत्रण, पाण्याची बचत व नवीन कोंबरी चांगली निघते. या कोंबरीचे वजन साधारण ३ किलोपर्यंत भरते.

साधारण १५ दिवसांच्या अंतराने ड्रीपद्वारे अमोनिअम सल्फेट, पोटॅशची मात्रा दिली. तसेच १ महिन्याच्या अंतराने अपेक्षित वजन व वाढ मिळण्यासाठी पोटॅशिअम सोनाईटची ठिबकद्वारे मात्रा दिली. एकरी उसाची संख्या ४० हजार ते ४५ हजार पर्यंत ठेवण्यात येते.

आगामी नियोजन ः

सध्या पीक १४ महिन्यांचे झाले आहे.

आता पावसात उघडीप असून पिकास आवश्कतेनुसार ठिबकद्वारे सिंचन केले जाईल.

आवश्यकतेनुसार मजूर लावून तण नियंत्रण केले जाईल.

उसाची वाढ चांगली होण्यासाठी जमिनीलगतचा वाळलेला पाला काढून टाकला जाईल. त्यामुळे आपोआपच तणांचा प्रादुर्भावही कमी होईल.

दर १५ दिवसांच्या अंतराने ड्रीपद्वारे अमोनिअम सल्फेट, पोटॅशची मात्रा दिली.

१ महिन्याच्या अंतराने अपेक्षित पोटॅशिअम सोनाईट दिले जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unproductive Cattle: गोवंशासाठी शेतकऱ्यांना अनुदान देणे शक्य नाही; भाकड जनावरांच्या प्रश्नावरुन सरकारचे उत्तर

Human Wildlife Conflict: रोगापेक्षा उपाय घातक

Sustainable Agriculture: शेती शाश्‍वत करण्यावर भर देणार

Guava Crop Disease: पेरू पिकावरील चक्राकार पांढरी माशी

Agricultural Equipment Bank: महिला गटाने उभारली कृषी अवजारे बँक

SCROLL FOR NEXT