Banana Disease Management : महाराष्ट्रात केळी लागवड प्रामुख्याने जून-जुलै महिन्यांत केली जाते. जून - जुलै महिन्यात लागवड केलेल्या केळी बागेला मृग बाग असं म्हणतात. मृग बाग लागवडीतील केळी घड उन्हाळी हंगामात काढणीस तयार होतात. विविध कारणांमुळे मृग बागेचं नुकसान जास्त प्रमाणात दिसून येतं. केळी बागेत प्रामुख्याने करपा म्हणजेच सिगाटोका या बुरशीजन्य आणि कुकुंबर मोझॅक या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यापैकी कुकुंबर मोझॅक म्हणजेच सीएमव्ही या विषाणूजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे केळी बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.
हा रोग लागवडीच्या सुरुवातीला येतो. नुकसान जास्त होत असल्यामुळे रोग नियंत्रणासाठी रोप पूर्ण उपटून नष्ट करावं लागतं. यामध्ये
- मृग बाग लागवडीची वेळ काटेकोरपणे पाळणं अत्यंत आवश्यक आहे. मृग बाग केळी लागवड ही मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्यात करावी. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात केळीची लागवड करणं टाळावं.
- जून महिन्यात लागवड केलेल्या केळी बागांवर सीएमव्ही रोगाचं प्रमाण काही भागांत अगदी कमी राहतं असं दिसून आलं आहे. तर काही बागा पूर्णपणे रोगमुक्त होत्या. पण जुलै-ऑगस्ट महिन्यांत लागवड केलेल्या बागांवर रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत होता. काही ठिकाणी तर बागेतील सर्व झाडे उपटून नष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.
त्यासाठी केळीची लागवड ही गादीवाफ्यावर करावी. गादीवाफ्यावर लागवड केल्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन झाडांची वाढही चांगली होते. त्यामुळे साहजिकच घडांची वाढ चांगली होऊन ते वजनानं देखील जास्त भरतात.
वेळोवेळी बागेत हलकी टिचणी करून झाडांना भर देत राहावे. त्यामुळे वादळी वाऱ्यामुळे झाडे पडण्याचं प्रमाण कमी होते.
- रोग व्यवस्थापनामध्ये लागवडीचे अंतर ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. केळी फळपिकात ‘श्रीमंती’ व ‘फुले प्राइड’ यांसारख्या बुटक्या वाणांची लागवड दीड बाय दीड मीटर अंतरावर करावी. तर ‘ग्रॅडनैन’ या उंच वाढणाऱ्या वाणाची १.७५ मीटर बाय १.७५ मीटर अंतरावर लागवड करावी.
- योग्य अंतरावर लागवड केल्यामुळे बागेत हवा खेळती राहून बाग निरोगी राहण्यास मदत होते. दाट लागवडीमुळे सिगाटोका आणि सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भावास अनुकूल वातावरण निर्मिती होते.
- कंदापासून लागवड करताना कंद निरोगी बागेतूनच निवडावेत. लागवडीपूर्वी शिफारशीप्रमाणे कंद प्रक्रिया करावी.
- शेतकऱ्यांचा कल हा ऊतीसंवर्धित रोपांकडे जास्त असतो. मुळातच उतिसंवर्धित रोपे नाजूक असल्याने ती रोगास सहज बळी पडतात. उतिसंवर्धित रोपांची लागवड करताना रोपे उत्तम दुय्यम कणखरता असलेली आणि ४ ते ५ पान असलेली निवडावीत. छोटी, कमी पाने असलेली पुरेशी कणखरता नसलेल्या रोपांची लागवडीसाठी निवड करू नये.
- बरेच शेतकरी केळी लागवडीवेळी सजीव कुंपण लागवडीकडे दुर्लक्ष करतात. बागेभोवती दुहेरी ओळीत शेवरी पिकाची सजीव कुंपण म्हणून लागवड करण्याची शिफारस केली आहे. अशाप्रकारे केळीची लागवड करताना काळजी घेतल्यास केळी बागेपासून चांगले उत्पादन मिळू शकेल.
-------------
माहिती आणि संशोधन - केळी संशोधन केंद्र, जळगाव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.