Chilli  Agrowon
ॲग्रो गाईड

Chilli Pest : मिरचीवरील फुलकिडे, पांढरी माशी, मावा लीफ कर्ल वर उपाययोजना

Team Agrowon

डॉ. संजय कोळसे, डॉ. अनिकेत चंदनशिवे व डॉ. सखाराम आघाव

Chilli Crop :

) फुलकिडे

- पानांच्या खालच्या व वरच्या बाजूस राहून पानांतील रस शोषून घेतात.

- शेंडा किंवा पानाच्या खालील बाजूस प्रादुर्भाव दिसतो.

- पाने लहान होतात. यालाच ‘बोकड्या किंवा चुरडा मुरडा’ असे म्हणतात.

नियंत्रण ः (प्रमाण ः प्रति लिटर)

- इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के एसएल) ०.२५ मिलि किंवा

- थायाक्लोप्रीड (२१.७० टक्के एस.सी.) ०.४५ मिलि किंवा

ॲसिटामाप्राइड (२० टक्के एस.पी.) ०.१६ ग्रॅम किंवा

लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ई.सी.) ०.७५ मिलि

स्टिकरसह प्रति लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारण्या कराव्यात.

२) पांढरी माशी ः

- पानातील रस शोषण करते. यामुळे पाने पिवळी पडून करपतात.

नियंत्रण ः

- एकरी १२ पिवळे चिकट सापळे लावावेत.

रासनिक फवारणी ः (प्रतिलिटर पाणी)

- फेनप्रोपॅथ्रिन (३० टक्के ई.सी.) ०.३४ मिलि किंवा

पायरिप्रॉक्सिफेन (५ टक्के) अधिक फेनप्रोपॅथ्रिन (१५ टक्के ई.सी.) (संयुक्त कीटकनाशक) १ मिलि किंवा

पायरीप्रॉक्सिफेन (१० टक्के ई.सी.) १.६६ मिलि किंवा

हॅक्सिथायझॉक्स (३.५ टक्के) अधिक डायफेन्थुरॉन (४२ टक्के डब्ल्यू.डी.जी.) (संयुक्त कीटकनाशक) १.३ ग्रॅम

३) मावा

- कोवळी पाने आणि शेंड्यातील रस शोषतात. त्यामुळे नवीन पालवी येणे थांबते.

रासायनिक नियंत्रण (प्रमाण ः प्रतिलिटर पाणी)

- फिप्रोनील (०.५ टक्का एस.सी.) १.६ मिलि किंवा

- फिप्रोनील (१८.८७ डब्ल्यी. डब्ल्यू.) ०.५ मिलि किंवा

- इमिडाक्लोप्रिड (३०.५० टक्के एम. एम. एस.सी.) ०.२५ मिलि किंवा

- पायरीप्रॉक्सिफेन (१० टक्के ई.सी.) १.६६ मिलि किंवा

- डायफेन्थुरॉन (४७ टक्के) अधिक बायफेन्थ्रीन (९.४० टक्के) (संयुक्त कीटकनाशक) १.२५ मिलि

मिरचीवरील रोग ः

१) लीफ कर्ल (बोकड्या, चुरडा मुरडा)

- या विषाणूजन्य रोगाचा प्रसार फुलकिडे, तुडतुडे व मावा या रसशोषक किडींमार्फत होतो.

- किडीने पानांतील रसशोषण केल्यामुळे पानांच्या शिरांमधील भागावर सुरकुत्या पडतात.

- संपूर्ण पानांची वाढ खुंटते. झाड रोगट दिसते. फुलधारणा बंद होते.

नियंत्रणासाठी उपाय ः

- रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून जाळून नष्ट करावीत.

- फुलकिडे, तुडतुडे व मावा या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी गरजेनुसार फवारणी करावी.

- मिरची पिकाच्या बाजूने मका पिकाची दोन ते तीन ओळींमध्ये लागवड करावी.

डॉ. संजय कोळसे, (वनस्पती रोग शास्त्रज्ञ) ९८९०१६३०२१

डॉ. सखाराम आघाव, (कीटकशास्त्रज्ञ) ९४२३००३३०७

(महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर येथे कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचे वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

GIS System : ‘जीआयएस’ देऊ शकते नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

SCROLL FOR NEXT