पाईपलाईन Agrowon
ॲग्रो गाईड

किस्से आळेफाट्याचेः पाईपलाईन

ताराबाईनं नंदुच्या जेसीपीला आडवा पाय लावला आणि सारा खेळच आटोपला. नदीवरुन पाच किलोमिटर पाईपलाईन करुन वावरात बारमाही पाणी खेळवायचा गड्याचा प्लॅन.

संतोष डुकरे 

ताराबाईनं नंदुच्या जेसीपीला आडवा पाय लावला आणि सारा खेळच आटोपला. नदीवरुन पाच किलोमिटर पाईपलाईन करुन वावरात बारमाही पाणी खेळवायचा गड्याचा प्लॅन. पण बाई आडवी आली आणि इस्कटलाच...

बरं आतापोतोर काय नाय केलं. कर्ज पास करायला बॅंकेनं दीड वर्ष खाल्लं. तवर पायपाच्या किमती वाढल्या. तरी आणलं. खाडायला वडार मिळना. जेसीबी पायला. पण तरीही इस्कोट सुरुच. रोज एकाची नाट...

गणप्या तेली, राम्या रामोशी, धना रोकडे सगळ्यांना पडकाचंही दोन पाच द्याव लागलं. बागायतात आली आन् दैना झाली. दरेकजण आडवायचं नि् पैसं मागायचं. तुकाशेटनं तर कहर केला. बाजार नसल्यानं कोबीच्या वावरात बकरं सोडायची व्हती. त्या कोबीचंही तेजीच्या 300 रुपये भावानं पैसं घेतलं. गपगुमान दिलं. सगळ्यांचं आत्मं थंड केलं. पाईपलाईनएवढं पैसं मधल्या वावरावाल्यांना वाटाया गेलं.

आता बाई आडवी आली. पैसं नको नं कायबी नको. वावरातून पाईपलाईन खांडायची नाय. नाय म्हणजे नाय. दोन, चार, सहा महिने झाले. काम बंद. करायचं काय. सगळा अडाणीपणाचा खेळ. शेवटी एका जोडीदारानं आयडीया दिली...

नंदूनं पाईपलाईन खोदाईच्या परवानगीसाठी अर्ज टाकला आणि तंटामुक्तीत गेला. समितीनं निर्णय दिला. पाईपलाईन दोन दिवसात खांडून गाडायची. बाईनं गप मुंडी हलवली. पाईपलाईन झाली.

नंद्या एवढं धाडस करुच शकत नाही. नक्कीच त्याला कोणतरी गुरु भेटलाय. हा ताराचा या प्रकरणाचा निष्कर्ष. ती आता आडव्यात घ्यायला नंदूचा गुरु शोधतेय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT