Orange Pest Management Agrowon
ॲग्रो गाईड

Orange Pest Management : संत्री, मोसंबीवरील कोळी किडीचे व्यवस्थापन

मोसंबी व संत्रा या लिंबूवर्गीय फळपिकांवर कोळी किडीच्या प्रादुर्भावात वाढ दिसून येत आहे. या किडीमुळे फळांचे नुकसान होऊन विकृत फळे तयार होतात.

Team Agrowon

डॉ. योगेश मात्रे, डॉ. पी. एस. नेहरकर, डॉ. ए. जी. लाड

Orange And Mosambi Pest Management : मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांत मोसंबीचे क्षेत्र (Mosabi Acreage) अधिक असून, मोसंबीवर कोळी किडीचा प्रादुर्भाव (Red Mite Outbreak On Orange) आढळून आला आहे. परभणी जिल्ह्यात संत्रा बागांचे (Orange Orchard) मोठे क्षेत्र असून, येथे संत्र्यांवर कोळी कीड दिसून येत आहे.

अन्य जिल्ह्यातही लिंबूवर्गीय बागेमध्ये (Citrus Orchard) या किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. हे लक्षात घेता प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून वेळीच उपाययोजना कराव्यात. मोसंबी व संत्रा या लिंबूवर्गीय फळपिकांवर कोळी किडीच्या प्रादुर्भावात वाढ दिसून येत आहे. या किडीमुळे फळांचे नुकसान होऊन विकृत फळे तयार होतात.

ओळख ः

१) कोळी ही कीड अष्टपाद वर्गातील असून, आकाराने सूक्ष्म असते. साध्या डोळ्यांनी दिसणे कठीण जाते.

२) पानांच्या शिराजवळ किंवा बरेचदा फळांच्या सालीवर बारीक खळग्यात ती अंडी घालते.

३) प्रौढ लांबट, पिवळे असून, पिल्ले फिक्कट पिवळसर असतात.

४) पिले व प्रौढ कोळी दिसायला सारखेच असले, तरी आकार लहान-मोठा असतो.

प्रादुर्भावाची लक्षणे

कोळी कीड पाने व फळांचा पृष्ठभाग खरवडतात. त्यातून येणाऱ्या रस शोषतात. परिणामी, पानावर पांढुरके चट्टे पडतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास चट्ट्याचा भाग वाळतो. फळावरील नुकसान तीव्र स्वरूपाचे असते. खरचटलेल्या जागी पेशींची वाढ खुंटते.

तपकिरी लालसर किंवा जांभळट रंगाचे चट्टे पडतात. यालाच शेतकरी ‘लाल्या’ म्हणून ओळखतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास अनियमित आकाराची फळे तयार होतात. आतील फोडींची वाढ बरोबर होत नाही. फळांची प्रत खालावते.

व्यवस्थापन

१. कोळी किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मोसंबी, संत्रा या लिंबूवर्गीय पिकांच्या फळावर होतो.

२. प्रादुर्भाव लवकर लक्षात न आल्यास प्रादुर्भावग्रस्त फळांचा रंग बदलतो. वेळोवेळी बागेची निरिक्षणे करून वेळीच उपाय करावेत.

३. पाण्याचा ताण पडू देऊ नये.

४. निंबोळी अर्क (५%) किंवा ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) ३ ते ५ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.

५. रासायनिक नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी

डायकोफॉल (१८.५ ईसी) २.७ मि.लि. किंवा

डायफेन्थ्युरॉन (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा

विद्राव्य गंधक ३ ग्रॅम. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.

डॉ. योगेश मात्रे, ७३८७५२१९५७, (कृषी कीटकशास्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

Canal Water Release : पाण्याचा प्रश्न ऐरणीवर: बंधारे भरण्यासाठी कॅनॉलमधून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची आर्त हाक

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

SCROLL FOR NEXT