Crop Advisory Agrowon
ॲग्रो गाईड

Crop Advisory : हरभरा, करडई, हळद पिकाची काळजी कशी घ्याल?

हरभरा, करडई, हळद, ऊस पिकातील व्यवस्थापनाविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली पाहिती पाहुया.

Team Agrowon

हरभरा पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण (Weed Control) करावे व आवश्यकतेनूसार तुषार सिंचन (Sprinkler Irrigation) पध्दतीने पाणी द्यावे. हरभरा पिकात घाटे अळीचा (Pod Borer) प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी Tआकाराचे प्रति एकर २० पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत. घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी ५ % (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस (२५ % इसी) २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (५ %) ४.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात मानकूजव्या आणि मर यांच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी किंवा बायोमिक्सची आळवणी करावी. बायोमिक्सच्या आळवणीसाठी पंपाचा नोझल काढून २०० ग्रॅम (पावडर) किंवा २०० मिली (लिक्वीड) प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. करडई पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. 

करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी डायमिथोएट (३० %) १३ मिली किंवा अॅसिफेट (७५ %) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात तणांच्या प्रादूर्भावानूसार पेरणीनंतर २५ ते ५० दिवसापर्यंत एक ते दोन कोळपण्या व खूरपण्या घ्याव्यात. 

बागायती करडई पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास ६५ किलो यूरिया प्रति हेक्टरी देऊन पाणी द्यावे. 

हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी बायोमिक्स १५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. हळदीवरील कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी १५ दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस (२५ %) २० मिली किंवा डायमिथोएट (३० %) १५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाच्या स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). 

ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस (२० %) २५ मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल (१८.५%) ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. खोडवा व्यवस्थापनासाठी ऊस पिकाची तोडणी झाल्यानंतर शेतातील पाचट जाळू नये.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT