Soybean Snail Control  Agrowon
ॲग्रो गाईड

Soybean Snail Control : शंखी गोगलगायीला आत्तापासूनच कसं रोखायचं?

Soybean Snail : मराठवाड्यात मागील वर्षी बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकावर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता.

Team Agrowon

Soybean Pest Control : मराठवाड्यात मागील वर्षी बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकावर (Soybean Crop) शंखी गोगलगायीचा (Snail) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. यामध्ये लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील १ लाख ६ हजारावर शेतकऱ्याचे ६३ हजार ८७० हेक्टर पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते.

गोगलगायी जून ते सप्टेंबर या काळात अत्यंत सक्रिय असतात व रोपावस्थेतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात त्यामुळे संपूर्ण पीक नष्ट होते.

शंखी गोगलगायी अतीथंड व अतिउष्ण हवामानात आपल्या कवचाचे तोंड पातळ पापुद्र्याने बंद करुन झाडाला किंवा भिंतीला चिटकून सुप्त अवस्थेत (Dormant Stage) जातात. येणाऱ्या हंगामान मागील वर्षी प्रमाणे परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे जास्त सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. एका शेतकऱ्याने उपाययोजना करुन हा उपद्रव पुर्णपने दूर होत नाही. तर सामूहिकरित्या उपाययोजना करण्याची गरज असते. त्यासाठी

हंगामातील पहिला पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या मोहीम राबवून नदी, नाले, ओढे, ओहळ, कालवा, पांदण किंवा पाणी साचलेला सखल भागात सुप्तावस्थेत असलेल्या गोगलगायी गोळा करुन नष्ट कराव्यात.

मे महिन्यात शेताची खोल नांगरट करावी. जेणेकरुन गोगलगायीच्या सुप्ताअवस्था नष्ट होतील. भिंती, भेगा, दगड, बांधावरुन दिवसा लपून बसलेल्या गोगलगायी शक्य तितक्या प्रमाणात जमा करुन प्लास्टिकच्या पोत्यात भरुन त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून नष्ट कराव्यात.

मागील वर्षीच्या गोगलगाय प्रादुर्भावग्रस्त भागांमध्ये शेतकऱ्यांनी शेताच्या बांधाच्या जवळ दोन्ही बाजूने १ ते २ फुटाचे चर काढावेत.

शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आत ८ किलो प्रती एकर याप्रमाणे तंबाखू भुकटीचा, कोरड्या राखेचा अथवा चुन्याचा १० सेंमी रुंदीचा पट्टा गोगलगायींना शेतात जाण्यास प्रतिबंध म्हणून व नयंत्रणासाठी टाकावा.

फळबागेमध्ये झाडाच्या खोडास १ किलो मोरचूद अधिक १ किलो चुना १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेली १० टक्के बोर्डोपेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाहीत.

याव्यतीरिक्त अंड्याच्या टरफलाचा चुरा, कोरडी राख,तांब्याची पट्टी अथवा जाळी, बोरिक पावडर चा वापर गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी करता येतो.

सायंकाळी किंवा सुर्योदयापुर्वी शेतातील गोगलगायी हातमोजे घालून आणि तोंडावर मास्क लावून गोळा करुन नष्ट कराव्यात.

जैविक व्यवस्थापनामध्ये एकरी ८ किलो निंबोळी पावडर, एकरी २० किलो निंबोळी पेंड, ५ टक्के निंबोळी अर्क या वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर बांधावर केल्यास गोगलगायींना शेतात येण्यापासून रोखता येईल.

अशाप्रकारे आत्तापसूनच एकत्रितपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास खरीपात शंखी गोगलगाईमुळे होणारे नुकसान टाळता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tipeshwar Wildlife Sanctuary : टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यासाठी भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध

Seaweed: पीक पोषणासाठी समुद्री शेवाळ अर्क

Krishi Seva Kendra Bbhandara : भंडारा जिल्ह्यातील ४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Sugarcane Pest Management: उसावरील पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन

Indian Politics: उपराष्ट्रपतिपदासाठी सरकारची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT