Seed Treatment Agrowon
ॲग्रो गाईड

Seed Treatment : बीजजन्य रोग टाळण्यासाठी मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया कशी करायची?

ज्वारी, भात आणि बाजरी या पिकाच्या बियाण्यावर मिठाच्या पाण्याची प्रक्रिया केली जाते त्यामुळे अरगट, काणी, करपा यारख्या रोगावर नियंत्रण मिळवता येते.

Team Agrowon

एखाद्या पिकापासून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी दर्जेदार बियाण्याची आवश्यकता असते. पेरणी करण्यापुर्वी बीजप्रक्रिया (Seed Processing) केली जाते. त्यामुळे बियाण्यातून प्रसारित होणाऱ्या रोगांना अटकाव घालता येतो.

म्हणूनच पेरणी करण्यापूर्वी बियाण्यावर बीज प्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो.  ज्वारी, भात आणि बाजरी या पिकाच्या बियाण्यावर मिठाच्या पाण्याची प्रक्रिया (Salt Water Treatment) केली जाते त्यामुळे अरगट, काणी, करपा यारख्या रोगावर नियंत्रण मिळवता येते.

ही मिठाच्या पाण्याची प्रक्रिया कशी करायची? याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.  

ज्वारी

बियाणे प्रक्रिया केलेले नसेल तर त्यासाठी ३ किलो मीठ १० लीटर पाण्यात मिसळावे. त्या द्रावणात पिशीतील बी ओतावे व चांगले ढवळावे.

त्यानंतर त्या द्रावणावर तरंगणाऱ्या स्क्लेरोशीया रोग पेशी व हलके बियाणे बाहेर काढून जाळून टाकावे व तळाशी असलेले जड बियाणे बाहेर काढून स्वच्छ पाण्याने तीन वेळा धुवावे व सावलीत वाळवावे आणि त्यानंतरच त्यास बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. या बीजप्रक्रियेमुळे ज्वारीवरील अरगट व काणी रोगाचे नियंत्रण होते. 

भात 

बीज प्रक्रियेसाठी ३ किलो मीठ १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. द्रावणात बी ओतावे व ढवळावे. द्रावणावर तंरगणारे हलके बी बाहेर काढून जाळावे.

तळाशी असलेले जड बियाणे बाहेर काढून ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे व सावलीत वाळवावे आणि त्यानंतरच बुरशीनाशखाची बीजप्रक्रिया करावी. या बीजप्रक्रियेमुळे बातावरिल कडा करपा, करपा रोगाचे नियंत्रण होते. 

बाजरी

बियाण्याला प्रक्रियेसाठी २० टक्के मिठाच्या पाण्याची प्रक्रिया करावी. यासाठी २ किलो मीठ १० लिटर पाण्यात मिसळावे. त्यामध्ये हे बीयाणे ओतून ढवळावे. द्रावणावर तरंगणाऱ्या स्क्लेरोशिया पेशी गोळा करुन जाळून टाकाव्यात.

तळाशी असलेले जड बियाणे बाहेर काढून तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत वाळवावे. या बीजप्रक्रियेमुळे बाजरी वरील अरगट रोगाचे नियंत्रण होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ajit Pawar In Politics : साखर कारखान्याचे संचालक ते राज्याचे उपमुख्यमंत्री; अजित पवारांची राजकीय कारकीर्द

Ajit Pawar Last Rites: 'दादा परत या...' अजितदादांच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर

Tribal Health: आदिवासी वस्त्यांत जनजागृती

CM Devendra Fadnavis: शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री

Sugarcane FRP: सोलापूर जिल्ह्यात ६४२ कोटींची ‘एफआरपी’ थकली

SCROLL FOR NEXT