Seed Treatment : ट्रायकोडर्मा बीजप्रक्रियेचे फायदे काय आहेत?

ट्रायकोडर्माच्या अनेक प्रजाती असल्या तरी त्यातील ट्रायकोडर्मा ॲस्पेरिलियम (व्हिरिडी) आणि ट्रायकोडर्मा हर्जियानम या दोन महत्त्वाच्या प्रजाती मातीत मुबलक प्रमाणात आढळतात.
Seed Treatment
Seed TreatmentAgrowon

ट्रायकोडर्माच्या (Trichoderma) अनेक प्रजाती असल्या तरी त्यातील ट्रायकोडर्मा ॲस्पेरिलियम (व्हिरिडी) आणि ट्रायकोडर्मा हर्जियानम या दोन महत्त्वाच्या प्रजाती मातीत मुबलक प्रमाणात आढळतात. त्या शेती व पिकाच्या दृष्टिकोनातून सुरक्षित आणि महत्त्वाच्या आहेत. शेतीमध्ये त्याचा वापर केल्याने निसर्गात कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. ट्रायकोडर्माची पिकांतील कार्यपद्धती, कोणकोणत्या रोगावर ट्रायकोडर्मा उपयुक्त ठरते याबाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.    

Seed Treatment
Seed Treatment : बिजप्रक्रिया का आहे गरजेची ?

ट्रायकोडर्माची पिकांतील कार्यपद्धती

पिकातील अँटिऑक्सिडेंट क्रियांचे प्रमाण वाढवते. 

ट्रायकोडर्मा ही जमिनीतील वेगवेगळ्या बुरशींना विळखा घालून त्यातील पोषक द्रव्य शोषून घेते. परिणामी, रोगकारक बुरशीमध्ये कार्बन, नायट्रोजन, जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होते. 

ट्रायकोडर्मा हे ग्लायटॉक्झिन व व्हिरिडीन नावाचे प्रतिजैविक मातीमध्ये निर्माण करतात. त्यामुळे रोगकारक बुरशीचे प्रमाण कमी होते. 

Seed Treatment
Seed Treatment : बीजप्रक्रिया करूनच करा पेरणी

ट्रायकोडर्मा वापरण्याचे फायदे काय आहेत?

बियाण्याची उगवणशक्ती वाढते. 

वनस्पतीच्या जैवरासायनिक प्रक्रियेत बदल करून वनस्पतीची प्रतिकारकशक्ती वाढवते. 

रोपांच्या मुळांच्या संख्येत आणि लांबीमध्ये वाढ होते. पिकाची वाढ जोमात होते. 

रोपांच्या मुळांवर ट्रायकोडर्माची वाढ झाल्याने रोगकारक बुरशीचा प्रवेश मुळांपर्यंत होऊ शकत नाही. त्यामुळे रोप कुजणे, मूळकूज, कंठीकूज, कोळशी, दाणेबुरशी, बोट्रायटिस, मर इ. रोगांपासून संरक्षण मिळते. 

ट्रायकोडर्मा ही बुरशी मातीमध्ये सेंद्रिय पदार्थावरही वाढते. त्यामुळे सेंद्रिय पदार्थ व्यवस्थित असलेल्या जमिनीमध्ये तिचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहते.

ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करताना कोणती काळजी घ्यावी?

कोरड्या जमिनीत ट्रायकोडर्माचा वापर करू नये.

ट्रायकोडर्मा वाढीसाठी जमिनीमध्ये योग्य आर्द्रता आवश्यक आहे. 

ट्रायकोडर्माद्वारे प्रक्रिया केलेले बियाणे थेट सूर्यप्रकाशात ठेवू नये.  

पुढील पीक आणि बुरशीजन्य रोगांवर ट्रायकोडर्मा उपयुक्त ठरते    

ज्वारी..............................काणी, कोळशी, दाणेबुरशी    

हळद ..............................कंदकूज   

आले  (अद्रक) ...................कंदकूज   

तूर ...................................फायटोप्थोरा, मर    

हरभरा .............................मर, मूळकूज   

सोयाबीन ..........................मर, मूळकूज   

मिरची ...............................मर, मूळकूज   

भुईमूग ..............................कंठीकूज, मूळकूज   

टरबूज ................................मर   

मोसंबी ................................मर   

केळी ...................................मर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com