Cotton Pest Agrowon
ॲग्रो गाईड

Cotton Pest:कापसावरील रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कसा टाळाल?

कापूस पिकावर पडणाऱ्या वेगवेगळ्या किडींमुळे पिकाचे सरासरी ५० ते ६० टक्के नुकसान होते. त्यापैकी १६ ते २७ टक्के नुकसान रसशोषक किडींमुळे होते, तर ३८ ते ७३ टक्के नुकसान बोंड अळ्यांमुळे होते.

टीम ॲग्रोवन

मराठवाड्यातील काही भागांत कापसावर (Cotton) रस शोषक किडींचा प्रादुर्भाव (Sucking Pest Outbreak) झाला आहे. ढगाळ वातावरण (Cloudy Weather) तसेच पावसाची उघडझाप यामुळे किडींसाठी पोषक वातावरण झालं आहे. बिटी कापसात (BT Cotton) फवारणीचे चुकीचे व्यवस्थापन तसेच किडीच्या नियंत्रणासाठी (Pest Control) फवारणीत केलेले बदल यामुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

कापूस पिकावर पडणाऱ्या वेगवेगळ्या किडींमुळे पिकाचे सरासरी ५० ते ६० टक्के नुकसान होते. त्यापैकी १६ ते २७ टक्के नुकसान रसशोषक किडींमुळे होते, तर ३८ ते ७३ टक्के नुकसान बोंड अळ्यांमुळे होते. नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र आणि परभणी येथील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी पुढील माहिती दिली आहे.

रसशोषक किडींच्या प्रादुर्भावाची कारणं काय आहेत?

- किडीच्या नियंत्रणासाठी फवारणीमध्ये केलेला बदल.

- निओनिकोटीनॉइड उदाहरणार्थ इमीडाक्लोप्रीड गटातील कीडनाशकांची किडींमध्ये निर्माण झालेली प्रतिकारशक्ती. किडी या कीडनाशकाला दाद देत नाहीत.

- एकापेक्षा अधिक कीडनाशके, विद्राव्य खते, संप्रेरके तसेच बुरशीनाशके यांचे मिश्रण करून फवारणी करणे.

- पिकावर कीडनाशकाची आवाजवी फवारणी करणे.

- कीडनाशकाचे अयोग्य प्रमाण वापरणे.

- नत्रयुक्त खताचा अतिवापर.

- किडीला पोषक हवामान.

रसशोषक किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय करावे ?

- शक्य असेल तर पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत केवळ रासायनिक कीडनाशकांचा वापर टाळावा.

- पतंगवर्गीय दुय्यम किडी जसे कापसाची पाने गुंडाळणारी अळी आणि कापसावरील उंटअळी यांचे नियंत्रण करण्यासाठी फवारणी करू नये.

- अॅसीटामाप्रीड, इमिडॅक्लोप्रीड, क्लोथीयानीडीन आणि थायामिथॉक्झाम या नियोनीकोटिनॉइड गटातील कीडनाशके किडींची प्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे त्यांचा वापर टाळावा.

- जागतिक आरोग्य संघटनेने अतिशय घातक वर्गामध्ये समाविष्ट केलेल्या कीडनाशकांचा जसे की मिथाईल पॅराथीयॉन, फोरेट, मोनोक्रोटोफॉस, कार्बोफ्युरॉन आणि मेटॉक्सिटॉक्स यांचा वापर करू नये.

- पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पायरेथ्रॉइड्स यांचा वापर टाळावा.

- कीडनाशकांचे मिश्रण करणे टाळावे. कीडनाशकांचे मिश्रण पर्यावरणाला जास्त घातक असल्यामुळे ते नवीन किडींच्या प्रादुर्भावासाठी कारणीभूत ठरते.

-शिफारस केलेल्या रासायनिक किडनाशकांची फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT