Nursery  Agrowon
ॲग्रो गाईड

Nursery: भाजीपाला पिकांची रोपवाटिका कशी कराल ?

पर्जन्यमान आणि उपलब्ध सिंचन व्यवस्थापन आदी बाबी विचारात घेऊन रोपवाटिकेचे नियोजन करावे.

Team Agrowon

भाजीपाला पिकांची रोपवाटिका (Vegetable Nursery) तयार करताना अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य भाजीपाला पिकाची निवड करावी. वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची पाण्याची गरज ही कमी-जास्त असते. पर्जन्यमान आणि उपलब्ध सिंचन व्यवस्थापन (Irrigation Management) आदी बाबी विचारात घेऊन रोपवाटिकेचे नियोजन करावे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या पद्धतीनूसार रोपवाटिकेत भाजीपाला पिकांच्या बियाण्यांची लागवड करावी.

भाजीपाला पिकाच्या बियाण्यांची खरेदी शक्यतो खात्रीशीर ठिकाणाहूनच करावी. बियाणे पाकिटावरील लॉट क्रमांक, टॅग क्रमांक आणि इतर मजकूर बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर खरेदी करावी. खरेदी केलेली बियाणे पाकिटे पीक उगवण होईपर्यंत जपून ठेवावीत.

१) सपाट किंवा बंदिस्त वाफे ः


- रिजरच्या साह्याने उभे व आडवे वाफे तयार करावेत. वरंब्याची उंची २५ ते ३० सेंमी ठेवावी.
- सपाट किंवा बंदिस्त वाफ्यांमुळे पावसाचे पाणी जागेवरच जमिनीत मुरले जाते. तसेच जमिनीत ५० टक्के जास्त ओलावा धरून ठेवण्यास मदत होते.

२) सरी वरंबा पद्धत


- मध्यम ते भारी जमिनीत लोखंडी नांगराने उतारास आडवे तास मारावेत.
- भाजीपाला पिकांच्या लागवड पद्धतीचा विचार करून ट्रॅक्टरच्या साह्याने सऱ्या पाडून घ्याव्यात.
- भाजीपाला पिकाच्या निवडीनुसार लागवड अंतर विचारात घेऊन सऱ्या पाडाव्यात.
- या पद्धतीमुळे लागवडीच्या कमी जास्त अंतरानुसार भाजीपाला पिकात ३० ते ३५ टक्के उत्पादनात वाढ होते.
- कोरडवाहू व चोपण जमिनीत पाणी मुरविण्यासाठी व जमिनीत विद्राव्य क्षाराचे प्रमाण कमी करण्यासाठी बंदिस्त सरी वरंबा पद्धत फायद्याची ठरते.

३) समपातळीत मशागत ः


खरीप हंगामात अधिक पाऊस असलेल्या क्षेत्रात समपातळीत मशागत केल्याने जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते. त्यासाठी जमिनीचे सपाटीकरण, नांगरणी, कुळवणी यासारखी मशागत समपातळीत करून घ्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement: ‘सीसीआय’ वाढविणार कापूस खरेदीची मर्यादा

Pawata Crop: भोर, हवेली, मुळशीत गावरान पावट्याचा हंगाम बहरला

Leopard Alert: रांजणगावच्या औद्योगिक क्षेत्रात धडकला बिबट्या

Bamboo Policy: ‘बांबू धोरण २०२५’ राबविण्याचे आदेश

Mahavistar App: कोणत्या हंगामात काय पेरायचं, कधी विकायचं?

SCROLL FOR NEXT