Watermelon Harvesting  Agrowon
ॲग्रो गाईड

Watermelon Harvesting : अशी करा कलिंगडाची काढणी? काढणीयोग्य कलिंगड कशी ओळखावीत?

Watermelon Harvesting : कलिंगड काढणी फळ पूर्ण पिकल्यावर करतात. नदीच्या पात्रातील फळे बागायतीपेक्षा थोडी लवकर तयार होतात. बी पेरल्यापासून तीन ते साडेतीन महिन्यात काढणी सुरु होते. तीन ते चार आठवड्यात काढणी पूर्ण होते.

Team Agrowon

Watermelon Farming : उन्हाळ्यात कलिंगडाला चांगली मागणी असते. त्यामुळे वेळेवर लागवड केलेले कलिंगड पीक सध्या काढणीस तयार आहेत. कलिंगड पीक कमी कालावधीचे पीक असून ६५ ते ९० दिवसात काढणीस  तयार होते. कलिंगडाची काढणी केंव्हा करावी ? तसंच काढणीयोग्य कलिंगड कसे ओळखावे? याविषय़ी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया. 

सूर्यप्रकाशापासून कलिंगड फळाचा बचाव करण्यासाठी व फळांच्या खालच्या बाजूला पिवळसर डाग न पडण्यासाठी फळे भाताच्या तुसाने किंवा गवताने झाकून घ्यावीत. काढणीपूर्वी कलिंगड पिकास सहा ते सात दिवस आधीच पाणी देणं बंद करावं. 

बऱ्याच ठिकाणी कलिंगड हे पीक काढणीसाठी तयार असून फळ तयार झाले की नाही हे ओळखण्यासाठी फळावर टिचकी मारल्यास तयार झालेल्या फळाचा टणटण असा आवाज येतो. तयार फळाच्या जमिनीलगतचा रंग पिवळसर होतो. तयार फळाच्या देठाजवळील तंतू सुकलेले असतात. 

काढणीस तयार कलिंगड पिकावर मावा, तुडतुडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानातून मधाळ अशा चिकट पदार्थाचे स्त्रवण होऊन त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते.

त्यामुळे फळे चिकट होऊन फळावरती काळ्या बुरशीची वाढ होण्याची शक्यता असते.
अशावेळी काढणीनंतर फळे धुऊन पुसून घ्यावीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT