Cotton Crop Agrowon
ॲग्रो गाईड

Cotton Crop Management : कपाशी पिकातील पातेगळ कशी रोखाल?

हवामान बदलामुळे कपाशीत पातेगळ होण्याची शक्यता आहे. कपाशीतील पातेगळ रोखण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील तज्ञांनी पुढील सल्ला दिला आहे.

Team Agrowon

कपाशीचे पीक सध्या पाते व फुल लागण्याच्या अवस्थेत आहे. जूनमध्ये लवकर लागवड केलेल्या कपाशीमध्ये बोंड पक्व होत आहेत. सध्या वातावरणामध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. कधी पावसाची उघडीप होऊन तापमानात वाढ होत आहे. तर कधी सलग ५ ते ६ दिवस पावसाचे वातावरण होत आहे. अशा हवामान बदलामुळे कपाशीत पातेगळ होण्याची शक्यता आहे. कपाशीतील पातेगळ रोखण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील तज्ञांनी पुढील सल्ला दिला आहे.

व्यवस्थापन कसे कराल?

कपाशीतील नैसर्गिक पातेगळ रोखण्यासाठी नॅपथेलिन ॲसीटीक ॲसीड (एनएए) २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पिकामध्ये दोन महिन्यानंतर नत्रयुक्त खताची मात्रा देण्यासाठी बागायती साठी ५२ किलो आणि कोरडवाहू साठी ३१ किलो युरिया प्रति एकर द्यावा.

अधिक उत्पादनासाठी कापूस पिकामध्ये २ टक्के डीएपी (२०० ग्रॅम) अधिक ५० ग्रॅम सुक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-२ प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे.

लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कपाशीच्या शेतामध्ये २० ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोन वेळा फुले लागण्याच्या आणि बोंडे भरण्याच्या अवस्थेत फवारावे.

फवारणी करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारशीतच वापरावे. कमी पाणी वापरल्यास कीड व रोगांचे अपेक्षित व्यवस्थापन होत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Mafia: विद्यापीठांच्या जमिनींवर भूमाफियांचा डोळा

Farmer Crisis: शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप राज्य सरकारने केले

Agriculture Funds: राज्याबरोबर केंद्राचाही ‘कृषी’ला निधी नाही

Farmer Electricity: शेतकऱ्यांना २४ तास वीज देणार

Maharashtra Winter Weather: थंडी ओसरली, चटका, उकाडा वाढला

SCROLL FOR NEXT