Watermelon Cultivation Agrowon
ॲग्रो गाईड

Watermelon Cultivation : कलिंगडाची लागवड कशी कराल?

कलिंगड फळाला वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते.

Team Agrowon

कलिंगड (Watermelon) फळाला वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. कलिंगडाच्या वाढत्या मागणीचा विचार करता कमी खर्चात, कमी पाण्यावर आणि कमी 

कालावधीमध्ये येणार पीक असल्यामुळे शेतकरी कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात करू लागला आहे. लागवडीसाठी सुधारित तंत्राचा वापर करुन योग्य लागवड पद्धत निवडावी. 

कलिंगड लागवड २५ फेब्रुवारीपर्यंत करता येते. आळे पद्धत, सरी-वरंबा पद्धत, रुंद गादी वाफा पद्धत आणि मल्चिंग पेपर तंत्रज्ञानाचा वापर करुन कलिंगडाची लागवड केली जाते.

लागवडीसाठी कमी पाण्यावर व अल्प कालावधीत येणाऱ्या जातींची निवड करणे गरजेचे आहे. यामध्ये शुगर बेबी, मधू, अर्का माणिक, मिलन, अमृत, अर्काज्योती, अर्का राजहंस,अर्का जीत या जातींचा समावेश होतो. 

कलिंगड लागवडीच्या पद्धती     

आळे पद्धत    

ठरावीक अंतरावर आळे करावे. त्यात शेणखत मिसळून मध्यभागी ४ ते ५ बिया टोकाव्यात.       

सरी-वरंबा पद्धत  

२ मीटर अंतरावर सऱ्या पाडून वाफ्यावर ०.५ मीटर अंतरावर बिया लावाव्यात.

रुंद गादी वाफ्यावर लागवड 

रुंद गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूंना लागवड केली जाते. त्यामुळे वेल गादीवाफ्यावर पसरतो व फळे पाण्याच्या संपर्कात येऊन खराब होत नाहीत.यासाठी ३ ते ४ मीटर अंतरावर सरी पाडावी. सरीच्या दोन्ही बाजूंना १ ते १.५ मीटरवर ३ ते ४ बिया लावाव्यात.

मल्चिंग पेपरचा वापर 

मल्चिंग पेपर टाकण्यापूर्वी गादीवाफा एकसमान करून घ्यावा. मधोमध ठिबकची लॅटरल टाकावी. गादीवाफ्यावर ४ फूट रुंदीचा ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचा मल्चिंग पेपर टाकावा. पेपर गादीवाफ्यावर समांतर राहील.

ढिला होणार नाही याची काळजी घ्यावी.एक एकरासाठी साधारण ५ ते ६ किलो पेपर लागतो. लागवडीच्या एक दिवस आधी लॅटरलच्या दोन्ही बाजूंस १५ सेंमी अंतरावर रोपे लावण्यासाठी पेपरला छिद्रे पाडून घ्यावीत.

दोन रोपांमधील अंतर २ फूट ठेवावे.त्यानंतर गादीवाफा ठिबक सिंचनाच्या साह्याने ओला करून घ्यावा. छिद्रे पाडलेल्या ठिकाणी योग्य वाढीच्या रोपांची लागवड करावी.

लागवड २५ फेब्रुवारीपर्यंत बिया टोकून करावी. प्रत्येक खड्ड्यात ३ ते ४ बिया २ सेंमी खोल आणि एकमेकांपासून ४ ते ५ सेंमी अंतरावर टाकाव्यात. बिया रुजल्यानंतर १५ दिवसांनी रोपांची विरळणी करावी.प्रत्येक ठिकाणी २ चांगली जोमदार रोपे ठेवावीत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment: १० कोटी महिलांना लखपती दीदी बनवू ; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

Agriculture Growth: उत्तर प्रदेशातील शेती क्षेत्र देशात आघाडीवर, १७ टक्के वाढ, जाणून घ्या वाढीमागील ६ प्रमुख घटक

Shiv Sena NCP Symbol Disputes: स्थानिक निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे- शरद पवारांना मोठा धक्का, पक्ष, चिन्ह वादावरील सुनावणी लांबणीवर

Phule Smart PDM App: कीड, रोग ओळखण्यासाठी ‘फुले स्मार्ट पीडीएम’

Heavy Rain Damage: धाराशिव जिल्ह्यातील १३७ शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेतच

SCROLL FOR NEXT