Wheat
Wheat Agrowon
ॲग्रो गाईड

सोलापुरात गवार, दोडका, कारल्यात तेजी

Sudarshan Sutaar

सोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या (Solapur Agricultural Produce Market Committee) आवारात गतसप्ताहात गवार, दोडका आणि कारल्याच्या दरात चांगलीच तेजी आली. त्यांची आवक तुलनेने कमी राहिली, पण मागणी वाढल्याने तेजीही टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारची रोज ५ ते १० क्विंटल, दोडका आणि कारल्याची १० ते १५ क्विंटल अशी आवक झाली. गवार, दोडका, कारल्याची (Guar, Dodka, Karlyachi) सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. पण मागणीच्या प्रमाणात त्यांची आवक नव्हती. त्यामुळे त्यांचे दर तेजीत राहिले. यापूर्वीही गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आवकेत किंचित तूट वगळता चढ-उतार आहे. पण दर मात्र टिकून आहेत.

गवारला प्रतिक्विंटलला १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये, दोडक्याला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये तर कारल्याला किमान १००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर आहे. त्याशिवाय टोमॅटो आणि वांग्याचे दर मात्र स्थिर राहिले. त्यांची आवकही जेमतेम ४० ते ८० क्विंटलपर्यंत होती. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये, तर टोमॅटोला (Tomatoes) किमान २०० रुपये, सरासरी ६०० रुपये आणि सर्वाधिक १२०० रुपये असा दर मिळाला.

ज्वारी, गव्हाला उठाव
गेल्या काही दिवसांपासून नव्या ज्वारी आणि गव्हाची (Sorghum and wheat) आवक बाजारात होते आहे. ज्वारीच्या तुलनेत गव्हाची आवक जास्त आहे. ज्वारीची आवक रोज ३० ते ५० क्विंटल तर गव्हाची (Wheat) आवक ५०० क्विंटल ते एक टनापर्यंत होते आहे. शिवाय मागणी असल्याने दरही टिकून आहेत. ज्वारीला प्रतिक्विंटलला किमान २००० रुपये, सरासरी २२०० रुपये आणि सर्वाधिक २८०० रुपये, तर गव्हाला किमान २३०० रुपये, सरासरी २७०० रुपये आणि सर्वाधिक ३४०० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे बाजार (Market) समितीकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Production : वाढत्या उष्णतेचा पशुधनावर थेट परिणाम, मुदतपूर्व प्रसूतीच्या घटनांत वाढ

Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

River Pollution : नदी प्रदूषणाबाबत गंभीर कधी होणार?

Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

SCROLL FOR NEXT