नगरमध्ये गवार, हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा

नगर :नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात हरभरा, तुरीची आवक वाढली आहे. भाजीपाल्यात हिरवी मिरची, गवारीसह अन्य काही भाजीपाल्याच्या दरात सुधारणा झाली आहे.
Improvement in the price of guar and green chillies in the Nagar
Improvement in the price of guar and green chillies in the Nagar

नगर  : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात हरभरा, तुरीची आवक वाढली आहे. भाजीपाल्यात हिरवी मिरची, गवारीसह अन्य काही भाजीपाल्याच्या दरात सुधारणा झाली आहे. 

नगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत गेल्या आठ दिवसापासून हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. दररोज साधारणपणे ७०० ते ९०० क्विंटलपर्यंत हरभऱ्याची आवक होत आहे. ३८५० ते ४५५० व सरासरी ४२०० रुपयांचा दर मिळत आहे. तुरीची दर दिवसाला २५० ते ३०० क्विंटलची आवक होत आहे. प्रतिक्विंटल ५१०० ते ६ हजार रुपये व सरासरी ५५५० रुपयांचा दर मिळत आहे. या शिवाय ज्वारीला १८०० ते २१००, बाजरीला १८०० ते १९००, करडईला ३४०० ते ३४५०, मोहरीला सहा हजार, मुगाला ४५०० ते ६५००, गव्हाला १९५० ते २२००, चिंचेला ५ हजार, १० हजार ५००, एरंडीला ६१०० ते ६३००, सोयाबीनला ५००० ते ७ हजार ३५०, मकाला १६०० ते २ हजार, सूर्यफुलाला ५२०० रुपये क्विंटल दर मिळत आहे. 

भाजीपाल्यात हिरवी मिरची, गवारीच्या दरात चांगलीच तेजी आहे. येथे दररोज गवारीची ४ ते ५ क्विंटलची आवक होऊन ११००० ते १५००० रुपयांचा, तर हिरव्या मिरचीची ४१ ते ४५ क्विंटलची आवक होऊन ७ हजार ते ९ हजार रुपयांचा दर मिळत आहे. टोमॅटोची २३० ते २४० क्विंटलची आवक होऊन ३०० ते १४००, वांग्यांची ३३ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार ५००, फ्लॉवरची ९८ ते १०० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १२००, कोबीची ७० ते ८० क्विंटलची आवक होऊन ३०० ते १४००, काकडीची ८५ ते ९० क्विंटलची आवक होऊन ६०० ते २ हजार, घोसाळ्याची ९ ते ११ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार, घेवड्याची १४ ते १५ क्विंटलची आवक होऊन १५०० ते २५००, बटाट्याची १३६ ते १४० क्विंटलची आवक होऊन ४०० ते १३०० रुपयांचा दर मिळाला. पालेभाज्यात मेथी, कोथिंबीर, पालक, चुका, शेपू, कढीपत्ता याला चांगली मागणी राहिली.

वाटाण्याची आवक चांगली

नगर येथील बाजार समितीत दर दिवसाला सुमारे १०० ते ११० क्विंटलपर्यंत वाटाण्याची आवक होत आहे. त्यास २ हजार ३२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. नगर जिल्ह्यात कान्हूर पठार भागात वाटाण्याचे पीक प्रसिद्ध आहे. चवळीचीही एक क्विंटलपर्यंत आवक होऊन दोन ते अडीच हजारापर्यंत दर मिळत आहे. कढीपत्त्याला एक हजार, डांगरला १८००, पुदिन्याला ५०० रुपयांचा दर मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com