Weeding Sword Agrowon
ॲग्रो गाईड

Weeding Sword : फळबागेतील तण नियंत्रणासाठी गवत तलवार

गवत तलवार या अवजाराने बागेतील तण अतिशय सोप्या पद्धतीने काढता येते.

Team Agrowon

फळबागांमध्ये (Fruit Crop) तणाच्या वाढत्या (Weed Infestation) प्रादुर्भावामुळे मुख्य पिकांना अन्न, पाणी, सूर्यप्रकाश इ. वाढीसाठी आवश्यक घटकांची कमतरता भासते. पिकांचे पोषण अपुरे होऊन त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. तणांच्या काढणीसाठी मनुष्यबळ वेळेवर उपलब्ध होत नाही. याशिवाय मजूरीवरील वाढता खर्च यामुळे उत्पादन खर्चात (Production Cost) वाढ होते. ही तणे अनेक रोग किडींची यजमान पिके असतात. या तणांवरील रोग-किडींचा फटका मुख्य पिकालाही बसतो. गवत तलवार या अवजाराने बागेतील तण अतिशय सोप्या पद्धतीने काढता येते. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेतील डॉ. यू. आर. सांगळे यांनी गवत तलवारीबद्दल दिलेली माहिती पाहुया.

अधिक गवतामुळे बागेमध्ये आर्द्रता सतत टिकून राहते. बागेतील सततच्या आर्द्रतेमुळे संत्रा बागेत कोलेटोट्रिकम ग्लास्पोरिऑइड्स या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. या बुरशीमुळे संत्रा फळे परिपक्व होण्यापूर्वीच गळून पडतात. गळलेली फळे ही पिवळ्या रंगाची व अधिक आंबट असतात.

बागेतील तण उभे राहूनच वेगाने काढण्याच्या उद्देशाने गवत तलवार, ग्रास कटर, ब्रश कटर अशी विविध यंत्रे व अवजारे तयार करण्यात आली आहेत. यातील काही यंत्रे ही इंधनावर चालतात. मात्र गवत तलवार हे हस्तचलित आहे. 

अन्य अवजारांच्या तुलनेने गवत तलवार स्वस्त असून, ३०० ते ३५० रुपयांपर्यंत मिळते. त्यामुळे दिड ते दोन तासातच एक एकरावरिल तणाची वेगाने  छाटणी करता येते. बागेतील गवताचे प्रमाण एकदम कमी होते. 

गवताचे सेंद्रिय पदार्थ जमिनीत गाडल्यास त्यातील अन्नद्रव्ये मुख्य पिकाला उपलब्ध होतात. तसेच जमिनीचा पोत सुधारतो. या सेंद्रिय पदार्थांवर जमिनीतील जिवाणू किंवा विविध सूक्ष्मजीवांचे पोषण होते. 

गवताची मुळे मातीत असल्यामुळे मातीची धूपही होत नाही. जमिनीवर त्याचे एक आच्छादन राहते. जमिनीमध्ये पाणी टिकून राहते. त्यामुळे गवत तलवार हे अवजार फळबागेतील तणनियंत्रणासाठी अतिशय उपयुक्त आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT