Amit Shah Agrowon
ॲग्रो गाईड

राजारामबापू दूध संघाचा अमित शहा यांच्या हस्ते गौरव

नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडियास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गोल्डन ज्युबली कार्यक्रमानिमित्त नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिर्व्हसिटी गांधीनगर, गुजरात येथे हा कार्यक्रम झाला.

ॲग्रोवन वृत्तसेवा

इस्लामपूर, जि. सांगली : येथील राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाचा (Rajarambapu Patil of Sahakari Dudh Sangh) केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडियास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गोल्डन ज्युबली कार्यक्रमानिमित्त नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिर्व्हसिटी गांधीनगर, गुजरात येथे हा कार्यक्रम झाला.
संघाच्या वतीने अध्यक्ष नेताजीराव पाटील व संचालक सुधीर पाटील यांनी सन्मान स्वीकारला. नेताजीराव पाटील म्हणाले, ‘‘लोकनेते राजारामबापू पाटील यांनी स्थापन केलेला आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेला राजारामबापू दूध संघ हा सर्वसामान्य दूध उत्पादकांचे (Milk Producer) हित व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने कार्यरत आहे.

संघामार्फत एनसीडीएफआयच्या (NCDFI) ई पोर्टलद्वारे (E- Portal) संघामार्फत उत्पादित करण्यात येत असलेली दर्जेदार कृष्णा दूध पावडर, (Milk Powder) बटरची विक्री करण्यात येते. यामध्ये संघाने सातत्याने सहभाग घेऊन जास्तीत जास्त पावडर बटरची विक्री केली आहे. संघाच्या सातत्यपूर्ण सहभागामुळेच संघाचा सन्मान करण्यात आला आहे.’’
कार्यक्रमास एनडीडीबीचे अध्यक्ष मिनेश शहा, एनसीडीएफआयचे अध्यक्ष मंगलजीत राय, कार्यकारी संचालक किशोर सुपेकर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT