Orange Farming Agrowon
ॲग्रो गाईड

शेतकरी पीक नियोजन : संत्रा

आमच्या कुटुंबाची भिवकुंडी (ता. मोर्शी, जि. अमरावती) येथे १३० एकर शेती आहे. संपूर्ण क्षेत्रावर संत्रा लागवड असून त्यात सुमारे १६ हजार झाडे आहेत. यातील १० हजार झाडांवर आंबिया बहर, तर उर्वरित ६ हजार झाडांवर मृग बहर धरला जातो.

टीम ॲग्रोवन

शेतकरी : संतोष पेठे

गाव : भिवकुंडी, ता. मोर्शी, जि. अमरावती

एकूण शेती : १३० एकर (संपूर्ण संत्रा लागवड)

एकूण झाडे ः १६ हजार

----------------------

आमच्या कुटुंबाची भिवकुंडी (ता. मोर्शी, जि. अमरावती) येथे १३० एकर शेती आहे. संपूर्ण क्षेत्रावर संत्रा लागवड असून त्यात सुमारे १६ हजार झाडे आहेत. यातील १० हजार झाडांवर आंबिया बहर, तर उर्वरित ६ हजार झाडांवर मृग बहर धरला जातो. संपूर्ण लागवडीमध्ये स्वयंचलित ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला आहे. त्यामुळे पाणी, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि खत व्यवस्थापन योग्य प्रकारे करता येते.

  • - एकूण लागवडीपैकी सुमारे ११०० झाडे ५० ते २५ वर्षांची, ७००० झाडे १० ते ११ वर्षांची तर ३ ते साडेतीन हजार झाडे २ ते ३ वर्षे वयाची आहेत.

  • - माझ्या वडीलांनी सुमारे ५ हजार झाडांची १८ बाय १८ फूट अंतरावर लागवड केली होती. त्यानंतर मी ८ हजार झाडांची २० बाय २० फूट अंतरावर आणि इंडो इस्त्राईल पद्धतीने २० बाय १० फूट अंतरावर सुमारे साडेतीन हजार झाडांची लागवड केली आहे.

  • - मागील ३ ते ४ वर्षांपूर्वी आमच्या भागात दुष्काळी स्थिती होती. या काळात अनेक शेतकऱ्यांनी विकतचे पाणी घेऊन संत्रा बागा जगविण्याचा प्रयत्न केला. तर काहींना ते शक्य झाले नाही. परिणामी, पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात बागेतील झाडे मरून गेली. त्या वेळी माझ्या बागेतील सुमारे ३ हजार झाडे जळाली. त्यानंतर नियोजन करून सुमारे ३ ते साडेतीन हजार झाडांची इंडो इस्त्राईल पद्धतीने नव्याने लागवड केली.

  • - सध्या माझ्याकडे २४ विहीरी आणि १३ बोअर आहेत. त्यातील उपलब्ध पाण्याचा सिंचनासाठी वापर केला जातो.

आंतरपीक पद्धती ठरली फायदेशीर ः

  • - संत्रा बागेतून अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी हरभरा, तूर आणि कलिंगड पिकाची आंतरपीक म्हणून लागवड केली जाते. आंतरपीक लागवडीमधून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे संत्रा बागेच्या व्यवस्थापनावरील उत्पादन खर्च निघण्यास मदत होते.

  • - यावर्षी चार एकरांवरील हरभरा लागवडीतून २८ क्विंटल तर ११ एकर तूर लागवडीतून १०४ क्विंटल उत्पादन मिळाले. तसेच कलिंगडाची ७ एकरावर लागवड केली असून १० मेपासून कलिंगड फळांची तोडणी सुरू होईल.

मागील १० दिवसांतील कामकाज ः

  • - ठिबकद्वारे कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो आणि मॅग्नेशिअम सल्फेट ३ किलो प्रति एकर प्रमाणे आठवड्यातून तीन दिवस दिले.

  • - या वर्षी मार्च महिन्यामध्येच तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. पाटपाणी पद्धतीने सिंचन केल्यास जमिनीचे तापमान वाढण्याची तसेच फळगळ होण्याची शक्यता असते. त्यासाठी ठिबकद्वारे बागेस सिंचन करणे फायद्याचे ठरते.

  • - त्यानुसार ठिबक संच सकाळी ११ च्या आधी आणि दुपारी ४ नंतर प्रत्येकी तीन तास सुरू केला जातो. काही काळ भारनियमनामुळे सिंचनामध्ये व्यत्यय येत होता.

आगामी नियोजन ः

आंबिया बहराची बाग ः

  • - सध्या बागेतील सुमारे १० हजार झाडांवर आंबिया बहर धरला आहे. फळे आवळ्याच्या आकाराची झालेली आहेत.

  • - तापमानात वाढ होत असल्याने प्रतिदिन ४ ते साडेचार तास ठिबक सुरू ठेवला जाईल.

  • - बागेत वाढलेले गवत रोटाव्हेटरच्या साह्याने काढले जाईल. तणनियंत्रणामुळे पोषक घटकांसाठी तण आणि झाडांची होणारी स्पर्धा कमी होते. त्यामुळे झाडांना पोषक घटकांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो.

  • - सध्या कॅल्शिअम नायट्रेट एकरी ३ किलो प्रमाणे आठवड्यातून ३ दिवस देत आहे. येत्या काळात आठवड्यातील ५ दिवस ही मात्रा दिली जाईल. कॅल्शिअम नायट्रेटमुळे फळांची गुणवत्ता सुधारून चकाकी येते.

  • - ठिबकद्वारे पोटॅश एकरी ३ किलो प्रमाणे आठवड्यातील ५ दिवस दिले जाईल. पोटॅशमुळे फळांचा आकार वाढण्यास मदत होते.

  • - ही फळे साधारण सप्टेंबर महिन्यात काढणीस येतील.

मृग बहराची बाग ः

  • - सहा हजार झाडांवर मृग बहर धरण्याचे प्रस्तावित आहे. बाग ताणावर सोडण्यापूर्वी शेणखत आणि रासायनिक खतांची मात्रा दिली जाईल. त्यानंतर रोटाव्हेटर फिरवून तणनियंत्रण केले जाईल.

  • - साधारण ५ मे पासून बाग ताणावर सोडली जाईल. हा ताण साधारण २५ दिवसांनी तोडला जाईल.

उत्पादन ः

  • - दरवर्षी मृग बहराच्या बागेतून सरासरी ५०० टन आणि आंबिया बहराच्या बागेतून १ हजार टन उत्पादन मिळते.

  • - मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे मृग बहराच्या बागेतील उत्पादनात मोठी घट आली. साधारण १५० टन उत्पादन मिळाले.

  • - उत्पादित सर्व फळांची केरळ, तमिळनाडू, बंगळूर येथील मार्केटमध्ये विक्री केली जाते.

- संतोष पेठे, ९६३७९४४९९०

(शब्दांकन : विनोद इंगोले)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Support: सातारा जिल्हा बँक प्रयोगशील शेतकऱ्यांच्या पाठीशी : राजेंद्र सरकाळे

Ahilyanagar Dams Water Level: अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांत ३५ टक्क्यांवर पाणीसाठा

Maize Procurement Delay: मका खरेदी केंद्रांच्या विलंबाने शेतकरी अडचणीत

Solapur Highway Project: केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते उद्या चार महामार्गांचे भूमिपूजन

Illegal HTBT Cotton Seeds: सोळा लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

SCROLL FOR NEXT