दुभत्या जनावरांना दूध उत्पादनाप्रमाणे (Like milk products to dairy animals) तसेच शरीरस्वास्थासाठी विविध प्रकारचा आहार दिला जातो. यामध्ये पशुखाद्य हिरवा चारा (Animal feed green fodder) व कोरडा चारा, खनिज मिश्रण आणि इतर पुरके इत्यादीचा समावेश होतो. पशुआहार गाई, म्हशींच्या (Cattle feeding cows, buffaloes) वाढीच्या स्थितीनुसार, जसे की वासरू, कालवड, गाभण, दुभत्या जनावरांमध्ये पहिले ३ महिने, मधले तीन महिने व नंतरचे तीन महिने या प्रमाणे दिला जातो. तयार पशुखाद्याशिवायही दूध उत्पादक आपल्या जनावरांना सरकी पेंड, गहू भुसा, मका भरडा इत्यादी कच्चा माल आपल्या अनुभवानुसार खाऊ घालतात. परंतु अशा प्रकारचे दिले जाणारे खाद्य, चारा इत्यादी संतुलित असेलच असे नाही. कारण गाई, म्हशी, वासरे गाभण जनावरांना असणारी रोजची गरज वेगवेगळी असते.
पशू आहारातील (Animal feed) जे घटक वापरले जातात, त्याचे प्रमाण अंदाजे ठरवलेले असते. त्या कच्च्या मालाची कुठेही प्रयोगशाळेतील तपासणी केलेली नसते. त्यामध्ये किती प्रथिने, फॅट, तंतुमय घटक, सॅण्ड सिलिका, ऊर्जा आणि एकूण पचनीय पदार्थ आहेत, हे दूध उत्पादकांना माहिती होत नाही. सध्या पशू आहाराचे वाढलेले दर आणि असंतुलित असणारे चारा व पशू आहार यांचे प्रमाण यामुळे दूधधंदा अडचणीत आहे. दुभत्या गाई-म्हशींकडून अपेक्षित दूध उत्पादन (Milk production) आपण घेऊ शकत नाही. त्यामुळे सध्या संतुलित खाद्य किंवा टीएमआर कसा आणि कुठे तयार करावा? याबद्दल दूध उत्पादकांना मार्गदर्शनाची गरज आहे.यासाठी ‘फॅमिली फीड मिलर’ संकल्पना महत्त्वाची आहे. गाई, म्हशी, वासरे, कालवडींना तसेच गाभण गायींना शारीरिक व दूध उत्पादनासाठी ज्या पोषकतत्त्वांची गरज आहे ती त्यांना त्यांच्या रोजचा आहार आणि चाऱ्यांमधून मिळणे अत्यावश्यक आहे. अन्यथा शरीरात कमतरता निर्माण होऊन त्याचा विपरीत परिणाम दूध उत्पादन (Milk production) तसेच शारीरिक वाढीवर होतो. जनावर आजारी पडण्याची शक्यता असते.
आपल्या विभागात उपलब्ध असलेला हिरवा चारा व कोरडा चारा यातून मिळणारी
पोषणतत्त्वेसुद्धा जनावरांचे आहार नियोजन करताना गृहीत धरायला हवीत. राहिलेली पोषणतत्त्वे पशुआहारातून जनावरांना मिळाली पाहिजेत. आता आपल्या तालुक्यात किंवा गाव स्तरावर बचत गट किंवा लघू उद्योजक म्हणून पशुखाद्य कारखाने उभे राहिले आहेत. हे लहान पशुखाद्य कारखाने एका तासाला ५०० किलो ते ५ मे टन इतके पशुखाद्य उत्पादन करू शकतात.
या लघू उद्योजक पशुखाद्य कारखान्यांना स्वतःचे असे पशुखाद्य धोरण ठरवण्याची गरज आहे, अन्यथा ते इतर मोठ्या पशुखाद्य उत्पादनांप्रमाणे लोकप्रिय पशुखाद्य उत्पादनांची प्रतिरूपे तयार करताना दिसतात. आपल्या विभागातील जनावरांना अनुरूप असे पशुखाद्य जर या लहान पशुखाद्य उत्पादकांकडून दूध उत्पादकांनी तयार करून घेतले आणि पशुखाद्य उत्पादकांनी देखील ते तितक्याच पारदर्शकपणे तयार करून दिले, तर ‘फॅमिली फीड मिलर’ ही संकल्पना महाराष्ट्रामध्ये आकाराला येऊ शकेल.
‘फॅमिली फीड मिलर' संकल्पना : (The concept of 'Family Feed Miller':)
पंजाब राज्यातील दूध उत्पादक आपल्या नजीकच्या पशुखाद्य उत्पादकांकडे आपल्या गाई, म्हशींचे दूध उत्पादन (Milk production of buffaloes) व शरीरस्वास्थ्य या प्रमाणे तज्ज्ञांकडून शिफारस केल्यानुसार किंवा त्यांच्या पूर्व अनुभवानुसार पशुआहारातील घटक निवडतात.पशुखाद्य उत्पादक त्यातील उपलब्ध कच्चा माल आणि पशुखाद्यपुरकांचे योग्य मिश्रण करून ते दूध उत्पादकांना तयार पशुखाद्य स्वरूपात देतात. याद्वारे पशुखाद्य उत्पादकांच्या स्थापित क्षमतेचा पुरेपूर वापर होण्यास मदत होते. दूध उत्पादकांना सुद्धा त्यांच्या जनावरांच्या गरजेप्रमाणे तसेच उपलब्ध चाऱ्यातील पोषक घटकांप्रमाणे पशू आहार तयार करून मिळतो. पशू उत्पादन कारखाना जवळ असल्यास वाहतूक खर्चात बचत होते. गरजेप्रमाणे ताजे पशुखाद्य तयार करून घेता येते.
महाराष्ट्रात लहान, मोठे पशुखाद्य निर्मिती (Animal feed production) कारखाने गाव व तालुका स्तरावर आहेत. परंतु योग्य धोरणाअभावी, कच्या मालाच्या अनुपलब्धतेमुळे तसेच मोठ्या पशुखाद्य निर्मिती कारखान्यांच्या तुलनेत विक्री व्यवस्थेतील त्रुटींमुळे असे लघू किंवा मध्यम आकाराचे पशुखाद्य उत्पादन कारखाने तोट्यात जाताना दिसतात.
तयार पशुखाद्य निर्मिती : (Preparation of ready animal feed:)
१) तयार पशुखाद्य निर्मिती म्हणजे धान्ये किंवा कृषी उपपदार्थांना प्रक्रिया करून त्यायोगे जनावरांना खाण्यायोग्य खाद्य (Food) बनविणे. पशुखाद्य हे जनावरांची शारीरिक गरज पूर्ण करते. असे पशुखाद्य (Physical and milk production) हे प्रक्रिया केलेला किंवा न केलेला कच्चा माल शास्त्रीयदृष्ट्या एकत्र करून बनवितात. त्याची बाजारात व्यावसायिक विक्री केली जाते. असे तयार पशुखाद्य गाई, म्हशी, वासरे, कोंबड्या, वराह, मासे, शेळी, मेंढी पालन उद्योगक्षेत्रांसाठी बनविले जाते.
२) चांगल्या प्रतीच्या उत्तम गुणवत्ता असणाऱ्या व योग्य फॉर्म्यूला वापरून एकत्र एकजीव केलेल्या संतुलित पशुखाद्याला जनावरे तितक्याच चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. तयार पशुखाद्यात आद्रता, पोषकतत्त्वांची उपलब्धता, पेलेट/गोळीचा पोत जनावरांना एकसमान उपलब्ध होतात.
३) पशुखाद्यातील गुणवत्तेवर जनावरांच्या उत्पादनातील कामगिरी अवलंबून असते. जनावरांना शारीरिक व दूध उत्पादनासाठी लागणारे घटक, शारीरिक वाढ, गाभण काळ आणि दूध उत्पादनासाठी विविध पोषकतत्वांची आवश्यकता असते. यासाठीच पशुखाद्य उत्पादन करीत असताना त्याची गुणवत्ता एकसारखी असावी. त्यापासून वातावरणाला कमीत कमी नुकसान व्हावे याचीही खबरदारी घ्यावी.
पशुखाद्यासाठी कच्चा माल (Raw material for animal feed)
१) जास्त व बायपास प्रथिने असलेले घटक उदा. रेपसीड डीओसी, मेझ ग्लुटेन, सोयाबीन डीओसी, कपाशी डीओसी, शेंगदाणा डीओसी, खोबरा पेंड, पाम केक, राइस ब्रान इत्यादी.
२) ऊर्जेचा स्रोत असलेले मका, गहू, गहु भुसा, ज्वारी, बाजरी बायपास फॅट, राइस पॉलिश, मळी इत्यादी.
३) उपलब्ध होणारा कच्चा माल, हंगामी पिकापासून उपलब्ध होणारे घटक इत्यादीचा वापर आपण पशुखाद्यामध्ये त्यातील पोषक तत्त्वे ही चवीने जनावरांनी खाण्याचे प्रमाण या व इतर निकषांवर ठरवू शकतो.
फॅमिली फीड मिलर संकल्पनेची अंमलबजावणी : (Implementation of the Family Feed Miller concept:)
१) सर्व प्रथम पशुपालकांनी जनावरांना (गाई, म्हशी, शेळी, मेंढी किंवा इतर) लागणाऱ्या पशुआहाराबद्दल जागरूक होणे गरजेचे आहे. जनावरांना लागणारे पशू आहारातील घटक आणि त्याचे प्रमाण तज्ज्ञांकडून निश्चित करून घ्यावे. त्यासाठी लागणारा चांगल्या गुणवत्तेचा कच्चा माल जवळच्या पशुखाद्य उत्पादकांकडे आहे याची खात्री करून घ्यावी.
२) पशुखाद्य उत्पादकांनी या कच्च्या मालाची येणारी प्रति बॅग किंवा प्रती बॅच किंमत त्यावर येणारा प्रक्रिया खर्च, नुकसान, कारखान्याचा खर्च, उत्पादन खर्च (Factory cost, production cost), बॅगेची किंमत, योग्य नफा व इतर खर्च जोडून येणारी एकूण किंमत दूध उत्पादकाला मान्य असल्यास त्या प्रकारचे पशू खाद्य बनवून द्यावे.
३) लागणारा सर्व कच्चा माल (Raw material) आणि पुरके पशुखाद्य निर्मिती कारखान्यात उपलब्ध असणे आवश्यक आहे. अद्ययावत यंत्रणा जरी नसली तरी पशुखाद्य निर्मितीसाठी लागणारी सर्व सामग्री उपलब्ध असावी. विजेची उपलब्धता, कच्च्या मालाचे बदलते दर इत्यादी घटकसुद्धा विचारात घेणे गरजेचे आहे.
४) सध्याच्या काळात वाढत जाणारे पशू आहाराचे (Animal feed) दर पहाता, आपल्या जवळील पशुखाद्य उत्पादकांकडे खात्रीशीररीत्या पशू आहार बनवून घेणे ही काळाची गरज आहे त्यामुळेच फॅमिली फीड मिलर संकल्पनेचा वापर दूध उत्पादकांनी करावा आणि पशुखाद्य निर्मिती कारखान्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवावी.
संपर्क : डॉ. पराग घोगळे, ९८९२०९९९६९
(लेखक पशुआहार तज्ज्ञ आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.