Green house Farming Agrowob
ॲग्रो गाईड

Green house Farming : वाढत्या उन्हात हरितगृह, शेडनेटमधील पीक व्यवस्थापन

Polyhouse Farming : वाढत्या तापमानात हरितगृह, शेडनेटमधील पिकांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. तापमान वाढीच्या परिस्थितीमध्ये हरितगृहाचे कर्टन दिवसभर उघडे ठेवावेत. शेडनेट सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पसरून ठेवावे,त्यानंतर उघडावे.

Team Agrowon

Vegetable Farming : वाढत्या तापमानात हरितगृह, शेडनेटमधील पिकांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. तापमान वाढीच्या परिस्थितीमध्ये हरितगृहाचे कर्टन दिवसभर उघडे ठेवावेत. शेडनेट सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पसरून ठेवावे,त्यानंतर उघडावे.

वाढत्या तापमानाच्या काळात सकाळी आणि सायंकाळी वाफसा स्थिती राहील या पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे.

गादीवाफ्याच्या कडा सकाळी ओल्या करून घ्याव्यात. शक्य असेल तर दोन्ही गादीवाफ्याच्यामधील भागामध्ये पाणी भरून ठेवावे.

हरितगृह, शेडनेटचे तापमान ३२ अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि रात्री २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवावे. तसेच आद्रता ६० टक्के ठेवण्याचा प्रयत्न करावा.

वाढत्या तापमानाच्या परिस्थितीमध्ये पिकांची अन्नद्रव्यांची गरज कमी आणि पाण्याची गरज जास्त प्रमाणात असते. यासाठी खतमात्रा निम्मी करून जिवाणू स्लरीचा वापर वाढवावा. म्हणजे स्थिर झालेली अन्नद्रव्ये पिकाला मिळतील.

नवीन भाजीपाला लागवडीसाठी जमीन तापू द्यावी. मातीमध्ये कुजलेले शेणखत मिसळावे. यामध्ये तागाची लागवड करून फुलोऱ्यात असताना गाडावा.

जुने प्लॉट संपले असतील तर या ठिकाणी नेट उघडी ठेवून नांगरट करून माती तापवून घ्यावी. म्हणजे नैसर्गिकरित्या मातीचे निर्जंतुकीकरण होते.

लागवड असलेल्या पिकाच्या क्षेत्राच्या मातीमध्ये क्षार वाढले असतील तर बेड रेकिंग /कुदळणी करून जिवाणू खतांचा वापर वाढवावा.

नवीन पीक लागवडी अगोदर पाणी आणि मातीचे परीक्षण करून घ्यावे.त्यानंतर शिफारशीनुसार खत मात्रा देण्याचे नियोजन करावे.

भाजीपाला पिकामध्ये विशेषतः रंगीत ढोबळी मिरचीची लहान फळे वेडीवाकडी आलेली असतील किंवा कीड, रोगाच्या प्रादुर्भावामुळे खराब झाली असतील तर काढून घ्यावीत.

रंगीत ढोबळी मिरची हिरवी असताना तोडून मागणीनुसार विक्री करावी.

झाडावर फळांचा जास्त भार ठेवू नये, टप्याटप्याने काढणी करावी.

पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यावर भर द्यावा. शक्यतो जैविक खते आणि कीडनाशकांचा वापर करावा.

बाजारपेठेतील परिस्थितीचा अंदाज घेऊन परदेशी भाजीपाला लागवडीचे नियोजन करावे.

हरितगृह,शेडनेटचे वादळी वारे, अवकाळी पावसापासून नुकसान होते, हे लक्षात घेऊन विमा उतरवून घ्यावा.

----------

माहिती आणि संशोधन - कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जि.पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT