Poultry Diseases Agrowon
ॲग्रो गाईड

Poultry Diseases : कोंबड्यांमध्ये या मार्गाने होतो रोगप्रसार

कुक्कुटपालनामध्ये अनेक मार्गांनी रोग प्रसार होण्याची शक्‍यता असते. हे लक्षात घेता उपचारापेक्षा प्रतिबंधास अधिक महत्त्व आहे.

Team Agrowon

कुक्कुटपालनामध्ये अनेक मार्गांनी रोग प्रसार (Poultry Diseases) होण्याची शक्‍यता असते. हे लक्षात घेता उपचारापेक्षा प्रतिबंधास अधिक महत्त्व आहे.

आजारी कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी (Poultry Management) लागणारी भांडी, खाद्य, पाणी व कामगार हे स्वतंत्र असावेत. शेड नेहमी स्वच्छ व कोरडे ठेवावे.

प्रतिबंधासाठी विनाकारण कोणालाही प्रक्षेत्रावर प्रवेश देऊ नये. कोंबड्यांमध्ये कोणकोणत्या मार्गाने रोगप्रसार होतो याविषयी उदगीर येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी दिलेली माहिती पाहुयात.  

अंड्यांमार्फत प्रसार    

रोग प्रसार एम्ब्रीओमार्फत पिलांमध्ये होतो.

यामध्ये सालमोनेल्लोसीस, मायकोप्लाझमोसीस, इन्फेक्‍शियस ब्रॉंकायटीस, फाउल टायफॉइड, रानीखेत आजारांचा समावेश होतो.

प्रसार टाळण्यासाठी हॅचरीजमध्ये योग्य काळजी घेणं आवश्‍यक आहे.

हॅचरीमधून प्रसार 

अंडी व कोंबडी विष्ठा, मूत्र यांचा अंड्यांच्या कवचाबरोबर संपर्क येतो. यामुळे अशा अंड्यांना गादी साहित्य, श्‍वसननलिकेतील स्राव, उपकरणे इत्यादींमार्फत संसर्ग होऊन प्रसार होतो.

यामध्ये स्ट्रेप्टोकोकोसीस, ई कोलाय इन्फेक्‍शन, प्रोटीओसीस, सालमोनेलोसीसचा प्रसार टाळण्यासाठी योग्य प्रकारची उपाययोजना हॅचरी तयार करताना करावी. 

हवेमार्फत रोगप्रसार 

कोंबड्यांना श्‍वसनाचे आजार झाले असल्यास त्यांचे श्‍वसनमार्गातील कण, स्राव, जंतू हवेत सोडले जातात.

मायकोप्लाझमोसीस, रानीखेत या सारख्या आजारांचा हवेमार्फत रोगप्रसार टाळण्यासाठीही आजारी कोंबड्यांना वेगळं ठेवून व्यवस्थापन आणि उपचार करावेत.

त्याचबरोबर आजारी कोंबड्यांचे व्यवस्थापन करणाऱ्या कामगाराला हातमोजे, बूट यांचा वापर करणं बंधनकारक करावं. शेडमध्ये हवा खेळती राहावी, आर्द्रता व वास वाढू देऊ नये.

माश्‍या, डासांद्वारे रोगप्रसार  

डास, गोचीड, पिसवा, माश्‍या इत्यादींमार्फत रोगप्रसार होतो. सदर कीटक आजारी कोंबड्यांपासून जंतूंचा प्रसार निरोगी कोंबड्यांपर्यंत करण्याचे काम करतात.

या कीटकांबरोबरच उंदीर, इतर पक्षीसुद्धा रोगप्रसाराचं काम करतात.  त्यामुळे कोंबड्यांतील रोगप्रसारावर योग्य वेळी नियंत्रण ठेवण आवश्यक असतं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara Power Crisis : अघोषित भारनियमनाने सातारा जिल्ह्यातील शेती संकटात

Ahilyanagar Power Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यात विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकरी बेजार

Mahabeej Jan Sanwad : महाबीज जनसंवाद कार्यक्रमातून जनजागृती

Farmer Support: संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे : सावे

Chandwad Drought : चांदवडचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा

SCROLL FOR NEXT