Sugarcane Disease Agrowon
ॲग्रो गाईड

Crop Protection : ऊसावरील रोग नियंत्रण

पावसाळी हंगामात उसाच्या पानांवर तांबेरा, पोक्का बोंग, तपकिरी ठिपके, डोळ्यासारखे दिसणारे ठिपके (आय स्पॉट), झोनेट स्पॉट आणि जमिनीतून पसरणारा मर आणि मुळकुज हे रोग दिसतात.

टीम ॲग्रोवन

तांबेरा

लक्षणे ः

- लहान व लांबट पिवळे ठिपके पानाच्या खालच्या बाजूस दिसून येतात. कालांतराने ठिपक्यांची लांबी वाढते. त्यांचा रंग लालसर तपकिरी किंवा तपकिरी होतो.

- ठिपक्यांचा भाग बुरशीच्या आणि बिजाणूंच्या वाढीमुळे फुगीर होतो. पानांचा ठिपक्यालगत भाग फुटून त्यातून नारिंगी किंवा तांबूस-तपकिरी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात.

नियंत्रणाचे उपाय:

- नत्रयुक्त खताचा तसेच इतर खताची मात्रा उशिरा देऊ नये. शेतातून पाण्याचा निचरा करावा.

- प्रोपिनेब २.५ ग्रॅम किंवा मॅंकोझेब ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने स्टीकर मिसळून २ ते ३ फवारण्या कराव्यात.

पोक्का बोंग ः

लक्षणे :

- सुरवातीस तिसऱ्या आणि चौथ्या पानांच्या बेचक्यात (पानाच्या व देठाच्या जोडाच्या ठिकाणी) पांढरट - पिवळसर पट्टे दिसून येतात. पाने आकसतात, लांबी घटते.

- रोगाची तीव्रता वाढल्यामुळे पोंगा मर किंवा शेंडा कूज दिसून येते. काही वेळेस कांड्यांवर कांडी काप (नाइफ कट) सारखी लक्षणे दिसून येतात.

- रोगाचा प्राथमिक प्रसार हवेमार्फत, तर दुय्यम प्रसार पाणी, पाऊस व किटकाद्वारे होतो.

नियंत्रणाचे उपाय :

- पिकास खतांची मात्रा माती परिक्षणानुसार योग्य प्रमाणात योग्य वेळी द्यावी.

- शेंडेकुज आणि पांगशा फुटलेले ऊस शेतातून वेगळे काढून जाळून नष्ट करावेत.

- कॉपर ऑक्झिक्लोराईड २ ग्रॅम किंवा कार्बेंन्डाझिम १ ग्रॅम किंवा मॅंकोझेब ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने स्टीकर वापरून गरजेनुसार २ ते ३ फवारण्या कराव्यात.

तपकिरी ठिपके

लक्षणे :

- पानावर लाल-तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात.

- कोवळ्या पानांपेक्षा जुन्या पानांवर ठिपके जास्त प्रमाणात दिसतात.

- पानांची पूर्ण वाढ होण्याआधीच पिवळी पडतात.

नियंत्रणाचे उपाय

- सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक खतांची मात्रा माती परिक्षणानुसार द्यावी.

- शेतात पाणी साचणार नाही अशा पद्धतीने निचरा व्यवस्था करावी.

- कॉपर ऑक्झीक्लोराईड २ ग्रॅम किंवा मँकोझेब ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी.

प्रतिबंधात्मक उपाययोजना ः

१. ऊस लागवडीकरिता निचरायुक्त जमिनी असाव्यात. रुंद सरी किंवा पट्टा पद्धतीची रानबांधणी करावी. हंगाम व जातीनिहाय लागवडीचे नियोजन करावे.

२. लागणीसाठी बेणेमळ्यातील बेण्याचा वापर करावा. बेणे मळ्यातील बेणे उपलब्ध नसल्यास १० ते ११ महिने वय असलेल्या लागणीच्या पिकातील रोग व कीडमुक्त ऊस बेण्यासाठी वापरावा.

३. कार्बेंन्डाझिम १०० ग्रॅम आणि इमिडाक्लोप्रिड (७० टक्के) ३६ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात १० ते १५ मिनिटे ऊस बेण्यास प्रक्रिया करावी. ही बीजप्रक्रिया गवताळ वाढ, काणी आणि मावा, तुडतुडे, पांढरीमाशीच्या नियंत्रणासाठी फायदेशीर ठरते.

४. खोल काळ्या जमिनीत उसाची लावण कोरड्या पद्धतीने करावी, जेणेकरून लावण खोलवर होणार नाही. अशा ठिकाणी रोपांचा वापर करावा.

संपर्क ः

डॉ. गणेश कोटगिरे, ८७८८१५३३३२

भरत पवार, ९८९०४२२२७५

(ऊस रोग शास्त्र विभाग,वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT