Sugarcane cultivation
Sugarcane cultivation Agrowon
ॲग्रो गाईड

Crop Advisory : असे करा खरीप पिकांचे व्यवस्थापन

Team Agrowon

गेले १५ दिवस जोरदार बरसल्यानंतर दोन दिवसात पावसाने उघडीप दिली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस वाऱ्याचा वेग जास्त राहील. काही ठिकाणी अतिशय हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा वातावरणात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेल्या सल्ल्यानूसार ऊस,(Sugarcane) कापूस, (Cotton) सोयाबीन (Soybean), मूग (Mung), उडीद (Urid), भाजीपाला पिके (Vegetable Crop) आणि वेलवर्गीय पिकाचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे करावे.

१) आडसाली ऊस
- कांडी किडीच्या नियंत्रणासाठी एकरी दोन फुले ट्रायकोकार्ड्स मोठ्या बांधणीनंतर दर पंधरा दिवसांनी ऊस तोडणी पुढे एक महिन्यापर्यंत लावावेत.
- नवीन आडसाली ऊस लागवडीसाठी रान तयार असल्यास १५ जुलै नंतर लागवड सुरू करावी. लागवडीसाठी को ८६०३२, को एम ०२६५, को व्ही एम आय ९८०५ या जातींची निवड करावी.
- बेणे नऊ ते दहा महिन्यांचे कोवळे, रसरशीत, रोग व कीडमुक्त लांब कांड्यांचे वापरावे.
- लागवडीसाठी दोन डोळ्यांची टिपरी वापरावी. लागवडी अगोदर हेक्टरी ३० टन म्हणजे ६० गाड्या शेणखत द्यावे. लागवडीच्यावेळी ४० किलो नत्र म्हणजे साधारण ८७ किलो युरिया, ८५ किलो स्फुरद म्हणजे ५३१ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८५ किलो पालाश साधारण १४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश दर हेक्टरी लागणीच्या वेळी सरीतून द्यावे.

२) कापूस
- कापूस पिक सध्या उगवण ते पाते लागण अवस्थेत आहे. बीटी कापूस बोंड आळ्यांना प्रतिकारक्षम राहण्यासाठी बीटी कपाशीच्या सभोवती ५ ओळी किंवा २० टक्के बिगर बीटी वाणाची लागवड करावी.
- रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी मित्र कीटकांचे संगोपन करण्यासाठी मिश्र पीक, आंतरपीक, सापळा पिके म्हणून मका, चवळी, झेंडूची लागवड करावी.

३) सोयाबीन
- सोयाबीन पीक सध्या रोप अवस्थेत आहे. स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी मुख्य पिकाच्या कडेने एरंडीची एक ओळ सापळा पीक म्हणून पेरावी.
- स्पोडोप्टेरा अळीच्या उपद्रवाचा आगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी पाच स्पोडोलूर चा वापर करण्यात आलेले फेरोमन सापळे नियंत्रणासाठी वापरावेत.

४) मूग- उडीद
- मूग पिक सध्या फांद्या फुटण्याच्या अवस्थेत आहे. शेतामध्ये वाफसा असताना दुसरी कोळपणी करून घ्यावी. त्यानंतर खुरपणी करावी.
- उडीद पीकमध्ये फांद्या फुटण्याचा अवस्थेत जर शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग कामगंध सापळ्यामध्ये सापडत असतील तर ट्रायकोग्रामा चे एकरी २५००० प्रौढ सोडावेत. शेंगा पोखरणाऱ्या अळीची अंडी किंवा लहान अळ्या दिसून आल्यास पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

५) तूर, भुईमूग
- तूर सध्या फांद्या फुटण्याच्या अवस्थेत आहे शेंगा पोखऱणाऱ्या अळीच्या नर पतंगांना आकर्षित करण्यासाठी दहा कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावावेत.
- भुईमूग सध्या रोप अवस्थेत असल्यामुळे जमिनीत ओलावा टिकविण्यासाठी हवा खेळती राहण्यासाठी तसेच तणाचे नियंत्रण करण्यासाठी हात कोळप्याने कोळपणी करून घ्यावी.

६) भाजीपाला पिके
- मिरची, वांगी, टोमॅटो, भेंडी, घेवडा, गवार, कांदा, वाल या पिकांची लागवड करून एक महिना झाला असेल तर त्या ठिकाणी खुरपणी करून पीक तणमुक्त करावे. शिफारशीनुसार वर खताची मात्रा द्यावी.
- टोमॅटो पिकावर पांढरी माशी, फुलकिडे, मावा व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड ३ मिली किंवा थायोमेथोक्झाम (२५ डब्ल्यू जी) ४ ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सिकोराइड २५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून साध्या हातपंपाने फवारणी करावी. अधून मधून पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी

७) वेलवर्गीय भाजीपाला पिके
- काकडी, कारली, दोडका, घोसाळी. दुधी भोपळा, तांबडा भोपळा या वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये केवडा (डाऊनी मिल्ड्यू ) रोगाची लक्षणे दिसून येत आहेत. रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावेत.
- प्रतिबंधक उपाय म्हणून बियाण्याची उगवण झाल्यानंतर वीस दिवसापासून आठ ते दहा दिवसाच्या अंतराने क्लोरोथॅलोनील किंवा कॉपरऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात साध्या हातपंपाने फवारणी करावी.
- रोगाची तीव्रता वाढल्यास मेटालॅक्झील एम झेड ७२ हे बुरशीनाशक २५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात दर दहा दिवसाच्या अंतराने फवारावे.
- भुरी रोगाची लक्षणे दिसताच ट्रायडेमोर्फ किंवा पॅन्कोनाझोल १० लिटर पाण्यात मिसळून साध्या हातपंपाने आलटून पालटून आवश्यकतेनुसार फवारण्या कराव्यात. फळमाशीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे एकरी पाच या प्रमाणात लावावेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT