Cashew Seeds Agrowon
ॲग्रो गाईड

काजू बी खरेदीदरात ५ ते १० रुपयांनी वाढ

मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देखील अपेक्षित काजू बीची आवक न झाल्यामुळे हे दर वाढल्याचे बोलले जात आहे.

टिम अॅग्रोवन

सिंधुदुर्गनगरी : काजू (Cashew) बी खरेदीच्या दरात प्रतिकिलो ५ ते १० रुपयांनी वाढ झाली आहे. मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देखील अपेक्षित काजू बीची आवक न झाल्यामुळे हे दर वाढल्याचे बोलले जात असून, काजू बीचा (Cashew Seeds) दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या वर्षी सरासरी २० ते २५ टक्केच उत्पादन आहे. अवकाळी पाऊस,(Unseasonal rain), सतत ढगाळ वातावरण आणि दोन वर्षांपासून असलेले कोरोनाचे सावट यामुळे काजू बागायतदार आर्थिक संकटात (financial crisis) सापडला होता. या वर्षीदेखील पहिल्या टप्प्यात काजूला आलेला मोहोर डिसेंबरमध्ये सलग २० दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) कुजून गेला.

त्यानंतर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पडलेल्या थंडीमुळे (Cold) पुन्हा काजूला मोहोर आला. परंतु सतत ढगाळ वातावरण आणि ९ मार्चला झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील काजू पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे काजू उत्पादनावर मोठा परिणाम झाला. जानेवारीपासून काही बागायतदारांच्या बागांमध्ये काजू (Cashew) बी परिपक्व होण्यास सुरुवात झाली. परंतु त्याचे प्रमाण अत्यल्प होते. तरीदेखील काजू हंगामाच्या (season) सुरुवातीला काजू बी दर प्रतिकिलो ११५ ते १२० इतकाच राहिला.

काजू खरेदीदारांना देखील काजू बीची आवक वाढेल अशी अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी काजू बीचे दर काही दिवस स्थिर ठेवले. परंतु आता मार्च महिना सुरू होऊन २० दिवस उलटून गेले आहेत. या महिन्यात काजू हंगाम पूर्णपणे बहरत असतो. परंतु अजूनही अपेक्षेप्रमाणे काजू बी बाजारात (Market) विक्रीसाठी येत नसल्यामुळे आता खरेदीदारांनी काजू बी दरात वाढ केली आहे. सध्या आठवडेबाजारात काजू बी १२५ ते १३० रुपयांनी खरेदी करण्यास सुरुवात केली असून, प्रतिकिलो ५ ते १० रुपयांनी दरात वाढ केली आहे. हा दर आणखी पाच ते दहा रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

माझी काजूची पाचशे झाडे आहेत. दरवर्षी सरासरी दोन ते तीन टन काजू बी उत्पादित होते. परंतु या वर्षी बदलत्या हवामानाचा (Weather) मोठा फटका काजूला बसला. आतापर्यंत ५०० ते ६०० किलोच उत्पादन (Production) झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झाली आहे.
रमेश गुरव, काजू बागायतदार कोकिसरे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT