कार्बोरेटरचा कचरा
कार्बोरेटरचा कचरा Agrowon
ॲग्रो गाईड

किस्से आळेफाट्याचेः कार्बोरेटरचा कचरा

संतोष डुकरे 

संतोष डुकरे

नर्सिंगबाईची ड्युटी रात्री 9 ला संपली. टॅक्टरड्रायवर नवरा मालकाला बैलगाडा शर्यतीत इनाम मिळालेल्या हिरो होंडावर मांड टाकून दवाखान्याच्या दारात उभा. हायवेला फलांगभर अंतर गेले नसतील तोच गाडीला अटॅक आला. शेवटचा आचका दिला तेव्हा दुसरा गिअर अडकलेला.

बाई बॉडीवान अन् नवराा काडीवान. गाडी ढकलायचं दोघांच्याही जिवावर. पान्हे काढले. प्लग साफ केला. कानवडी केली. नळी फुंकली. गालफुग्या करुन टाकीत हवा फुकली. पण गाडीच्या जिवात जिव येईना.

अंधार वाढला. तणतण वाढली. घाम फुटला. हमरातुमरी वाढली. अशातच पुढून हाता काठ्या घेवून दोन जण चालत आलं. बाईच्या पोटात गोळा. डायवर चिनभिन. पाहतात तो दोन धनगर बखोटीला पिश्या मारुन चाललेलं. फेट्याला हात घालत एकानं विचारलं, काय झालं ? डायवरनं कसंबसं दुखणं सांगितलं. व्हा बाजूला, कार्बोरेटरमधी कचरा आडकला आसल. आदेश सुटला.

झालं. गाडीचा ताबा धनगरांनी घेतला. एकानं पुढच्या दुसऱ्यानं मागच्या चाकाला हात घातला आन् एका झटक्यात गाडी उलटी केली. खाली डोकं वर पाय. दोन्ही चाकं ताणून धरलेली. हॅंडल, शिट, लोंबकळतंय. गव्हा बाजरीच्या पोत्याला घडी पडू नये म्हणून जसं हासडतात तसं त्यांनी गाडी हासडायला सुरवात केली. एक, दोन, तीन हासडे झाले आणि पुन्हा एका झोल्यात गाडी सरळ. आता मारा किक...

डायवरनं वासलेलं तोंड कसंबसं मिटलं आणि गळालेल्या अवसानातच किक मारली. हाप किकला गाडी स्टार्ट. नर्सिंग बाई टुनकन गाडीवर बसल्या. धनगरानं फेटा डोक्यावर चढीस्तोवर गाडी आळेफाट्याच्या एस.टी स्टॅंडला पोचली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT