परोपजीवी मित्र कीटक ः कोटेशिया प्लुटेला 
ॲग्रो गाईड

परोपजीवी मित्र-कीटकांची ओळख

विवेक सवडे, डॉ. धीरज कदम

सध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या अविवेकी वापर केला जात असल्याने मित्रकीटकांचे प्रमाण कमी झाले आहे. अशा स्थितीमध्ये परोपजीवी मित्रकीटकांची ओळख आणि संवर्धन काळाची गरज बनली आहे.

कीडनाशकांच्या अतिरेकी व अविवेकी   वापरामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढत असून, नियंत्रण करणे अवघड होत आहे. सोबतच शेतातील मित्रकीटकांची संख्याही कमी होत आहे.

प्राणीजगतात कीटकांचा वर्ग मोठा असून, त्यात शेतीसाठी नुकसानकारक असलेल्या किडीसोबतच असंख्य उपयुक्त कीटकही आहेत. अशा उपयुक्त कीटकांच्या साह्याने "जीवो जीवस्य जीवनम'' या मूलभूत तत्त्वावर किडींचे जैविक पद्धतीने नियंत्रण करणे शक्य आहे.

परोपजीवी मित्र कीटक हे मित्रकीटक नुकसानकारक किडींपेक्षा आकाराने लहान असतात. ते किडीच्या अंगावर किंवा शरीरामध्ये राहतात. किंवा किडींच्या शरीरामध्ये, शरीरावर अंडी घालून तिला हळूहळू खातात.

परजीवी मित्र-किडींचे वर्गीकरण अंडी -परोपजीवी (Egg Parasitoid) या परोपजीवी कीटकाची मादी यजमान किडीच्या अंड्यामध्ये अंडी घालते. त्यातून बाहेर आलेली अळी यजमान किडीच्या अंड्यातील गर्भाचा भाग खाते. ३ ते ४ दिवसांत अळी कोषावस्थेत जाते.

अशा प्रकारे अंडी, अळी व कोष या तिन्ही अवस्था यजमान किडीच्या अंड्यातच पूर्ण होतात. कोषातून बाहेर पडलेला प्रौढ अंड्याला छिद्र पाडून बाहेर पडतो. या प्रक्रियेमध्ये यजमान किडीची अंडी उबण्याआधीच नष्ट होतात.

परोपजीवी मित्र कीटक - यजमान कीड

  1. ट्रायकोग्रामा चिलोनस - कपाशीवरील बोंड अळ्या, उसावरील कांडी कीड अणि भातावरील पाने गुंडाळणारी अळी इ.

  1. ट्रायकोग्रामा जपोनिकम आणि टेलिनॉमस रोवाणी - भातावरील खोड कीड

  1. टेलिनॉमस रीमस - तंबाकूची पाने खाणारी अळी

  1. ट्रायकोग्रामा बॅक्टरी - कपाशीवरील गुलाबी बोंड अळी

अंडी - अळी- परोपजीवी (Egg-larval Parasitoid) मादी परोपजीवी यजमान किडीच्या अंड्यांमध्ये अंडी घालते, परंतु त्यांच्या अळ्यांचा विकास होऊन प्रौढ हे यजमान किडीच्या अळी अवस्थेतून त्यांना नष्ट करून बाहेर येतात.

परोपजीवी मित्र कीटक - यजमान कीड

  1. कोपिडोसोमा कोहेलेरी - बटाट्यावरील पाकोळी

  1. चेलोनस ब्लॅकबर्नी - ठिपक्याची बोंड अळी

अळी - परजीवी (Larval Parasitoid) मादी यजमान किडींच्या अळ्यांवर किंवा त्यांच्या शरीराच्या आत अंडी घालते. शरीरातील द्रव परजीवी किडीच्या अळ्या खाऊन टाकतात. त्यामुळे यजमान किडींच्या अळी मृत होते. परोपजीवी मित्र कीटक - यजमान कीड

  • ब्रॅकोन ब्रेव्हीकोर्निस आणि ब्रॅकोन हेबेटर ः कापसावरील बोंड अळी, बटाट्यावरील पाकोळी, भेंडीवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, भात, मका व उसावरील खोड किडा, नारळावरील काळ्या डोक्‍याची अळी
  • कोटेशिया प्लुटेला ः कोबी वरील चौकोनी ठिपक्याचा पतंग
  • गोनियोझस नेफॅन्टिडीस ः नारळावरील काळ्या डोक्‍याची अळी
  • प्लॅटिग्यास्टर ओरायजी ः भातावरील गाद माशी
  • कॅम्पोलेटिस क्लोरीडा ः कापसावरील बोंड अळी
  • एरिबोरस ट्रोचेनन्टेरॅटस ः नारळावरील काळ्या डोक्‍याची अळी
  • डॉ. धीरज कदम, ९४२१६२१९१०, विवेक सवडे, ९६७३११३३८३ (लेखक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील सहयोगी प्राध्यापक असून, विवेक सवडे हे आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत.) 

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

    Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

    Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

    Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

    Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

    SCROLL FOR NEXT