गुणवंत चारा पीक
गुणवंत चारा पीक 
ॲग्रो गाईड

प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीक

के. एल. जगताप

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संकरित बाजरी व नेपियर गवताचा संकर करून गुणवंत हे चारापिकाचे वाण विकसित केले अाहे. गुणवंत या चारापिकाची पाने लांब असून पालेदार, मऊ, रसरशीत असतात.   अधिक उत्पादनाकरिता तसेच जनावरांचे स्वास्थ्य अधिक काळ उत्तमरीत्या टिकवून ठेवण्याकरिता हिरवा चारा दैनंदिन आहारात देणे गरजेचे आहे. गुणवंत हे चारापीक चवीला रुचकर असून, पचायला पाचक अाहे. ओक्झॅलिक आम्लाचे (२.०५) प्रमाण कमी अाणि प्रथिनांचे प्रमाण (९.४६) जास्त आहे. जमीन काळ्या कसदार अाणि मध्यम ते भारी जमिनीत या पिकाची वाढ उत्तम होते. जमिनीची पाणी निचरा होण्याची क्षमता चांगली असावी. जमिनीचा सामू ५ ते ८ च्यादरम्यान असावा. जमिनीची मशागत खोल नांगरट करून जमीन भुसभुशीत होण्यासाठी कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. हवामान साधारणपणे ३० अंश सेल्सिअसच्या वर तापमान असेल तर वाढ उत्तम होते. उन्हाळा तसेच पावसाळा हे दोन ऋतू अाणि स्वच्छ सूर्यप्रकाश या पिकाच्या वाढीस पोषक असतो. लागवडीचा हंगाम वर्षभरात कोणत्याही महिन्यात या चारापिकाची लागवड करता येते. फक्त तापमान १५ सेल्सिअसपेक्षा कमी नसावे. उन्हाळा - फेब्रुवारी ते मार्च, पावसाळा - जून ते आॅगस्ट या महिन्यांत लागवड केल्यास पिकाची चांगली वाढ होते. लागवडीचे अंतर ६० X ९० सेंमी अंतर ठेवल्यास हेक्टरी २ डोळ्यांच्या ठोंबांची संख्या १८००० लागते. लागवडीची पद्धत दोन डोळे असलेले ठोंब वापरताना ६० सेमी अंतरावर अशा पद्धतीने लागवड करावी, जेणेकरून एक डोळा जमिनीत व एक डोळा जमिनीच्या वर राहील. दोन ओळीतील अंतर हे ९० सेमी ठेवावे. रासायनिक खतांची मात्रा लागवडीच्या वेळी एकरी ५० : २५ : २० किलो नत्र, स्फुरद, व पालाश द्यावे. प्रत्येक कापणीनंतर एकरी २० किलो नत्र द्यावे. खांदणी करतेवेळी २० : २५ : २० किलो नत्र, स्फुरद, व पालाश द्यावे. आंतरमशागत पिकाच्या वाढीच्या काळात एक ते दोन खुरपण्या कराव्यात. प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या अखेरीस एका ठिकाणी २ ते ३ फुटवे ठेवून बाकीचे सर्व काढून टाकावे. पाणी व्यवस्थापन लागवडीच्या वेळी सुरवातीला दोन व त्यानंतर १० ते १५ दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पावसाळ्यात पावसाचा अंदाज घेऊन पिकाला पाणी द्यावे. साधारणपणे पिकाला ८०० ते ९०० मिमी पाण्याची गरज असते. कापणी कापणी करत असताना जमिनीपासून १५ ते २० सेमी. अंतरावर कापणी करावी. त्यामुळे चांगले फुटवे येण्यास मदत होईल. एका वर्षात ६ ते ८ कापण्या होतात. प्रतिहेक्टरी हिरव्या चाऱ्याचे उत्पादन हे १२० ते १५० टन होते. संपर्क ः के. एल. जगताप, ९८८१५३४१४७ (विषय विशेषज्ञ पशू संवर्धन व दुग्धशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, जि. बीड)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT