फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव. 
ॲग्रो गाईड

मोसंबी, डाळिंबातील फळे पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण

विवेक सवडे, डॉ. धीरज कदम

  मोसंबी आणि डाळिंब या फळपिकांमध्ये फळ पोखरणाऱ्या अळी चा प्रामुख्याने प्रादुर्भाव आढळत आहे. ही किड आर्थिकदृष्ट्या अधिक नुकसानकारक असल्याचे दिसून येत आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना वेळीच करणे आवश्यक आहे.   फळ पोखरणारी अळी  त्याचे शास्त्रीय नाव ः Deudorix isocrates

  • महाराष्ट्रात मोसंबी आणि डाळिंब या फळपिकांवर ही कीड सर्वत्र आढळून येते.
  • नर पतंग हे चमकदार निळसर रंगाचे असून, मादी पतंगाच्या समोरील दोन पंखावर ठळक नारंगी पट्टा असतो.
  • मादी पतंग कळी, फुलांच्या पाकळ्या, फळांच्या देठाजवळ, फळांचा सालीवर व त्याच्या खालील बाजूस पांढऱ्या रंगाची २५ ते ४५ अंडी घालते. ही अंडी ६ ते ९ दिवसांत उबून, त्यातून अळी बाहेर पडते. ती फळाला छिद्र पाडून आत शिरते. १२ ते २० दिवसांत कोषावस्थेत जाते. कोषावस्था साधारणतः ८ ते १२ दिवसांत पूर्ण होऊन त्यातून फुलपाखरू बाहेर पडते.
  • नुकसानीचा प्रकार या किडीची अळी फळाला छिद्र पाडून आत शिरून नुकसान करते. या छिद्रामधून अळीची विष्ठा सतत बाहेर येताना दिसते. अशी प्रादुर्भावग्रस्त फळे सडतात आणि नंतर गळून जातात. नियंत्रण प्रादुर्भावग्रस्त फळे गोळा करून नष्ट करावेत. नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी डेल्टामेथ्रीन (२.८ ई. सी.) १.५ मिली किंवा मिथोमिल (४० एस. पी.) १ मिली किंवा निम्बोळी अर्क (१५०० पीपीएम) ३ मिली   डॉ. धिरज कदम, ९४२१६२१९१० विवेक सवडे, ९६७३११३३८३ (लेखक कृषी कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे सहयोगी प्राध्यापक असून, विवेक सवडे आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत.) 

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

    Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

    Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

    Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

    Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

    SCROLL FOR NEXT