ओट चारा पीक लागवड तंत्रज्ञान  
ॲग्रो गाईड

ओट चारा पीक लागवड तंत्रज्ञान

सुधीर सूर्यगंध

ओट हे एक रब्बी हंगामातील महत्त्वाचे चाऱ्याचे पीक आहे. यामध्ये ८ ते ९ टक्के प्रथिने असतात. 

जमीन :  मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन या पिकास मानवते.

पूर्वमशागत :   एक नांगरट करावी. दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

पेरणी :   पाभरीने ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी. हेक्‍टरी १०० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी ॲझोटोबॅक्‍टर जीवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.

सुधारित जाती :  फुले हरिता, केंट, जे.एच.ओ.-८२२ या जातींचा वापर लागवडीसाठी करावा.

खते : पूर्वमशागतीच्या वेळेस प्रतिहेक्‍टरी १०-१२ बैलगाड्या शेणखत जमिनीत मिसळावे. प्रतिहेक्‍टरी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. पेरणीनंतर २५ दिवसांनी ४० किलो नत्र, तसेच पहिल्या कापणीनंतर ४० किलो नत्र प्रतिहेक्‍टरी द्यावे.

आंतरमशागत : पेरणीनंतर पहिली खुरपणी ३० दिवसांनी करून तणाचा प्रार्दुभाव होणार याची काळजी घ्यावी.

पाणी व्यवस्थापन : या पिकास १० ते १२ दिवसांनी पाणी देण्याची व्यवस्था करावी.

उत्पादन :  या पिकाचे दोन कापण्यांचे ५०० -६०० क्विंटल प्रतिहेक्‍टरी इतके उत्पादन मिळते.  संपर्क : सुधीर सूर्यगंध - ९८२२६११९३४ (लेखक डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे, जि. कोल्हापूर येथे विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन) आहेत.)  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Management: ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ची सुरुवात

Ahilyanagar Heatwave: अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता

Rajura Farmer Issues: राजुरा येथे पाच शेतकऱ्यांनी घेतले विष

Women Empowerment: बचत गटांच्या महिलांची उल्लेखनीय कामगिरी

Soybean Crop Insurance: सोयाबीनचा ४५ कोटींचा विमा मंजूर

SCROLL FOR NEXT