ॲग्रो गाईड

रब्बी हंगामात कोणत्या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा?

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

अत्यल्प पावसावर येणारी रब्बी हंगामातील आंतरपीक पद्धती       रब्बी ज्वारी+ करडई ः ज्या क्षेत्रावर रब्बी ज्वारी मोठ्या प्रमाणात घेतली जाते त्याठिकाणी ६ः३ या ओळीच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धतीने लागवड करावी. 

 करडई+ हरभरा ः मध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस.  ६ः३, ३ः३ किंवा २ः४ ओळींच्या प्रमाणात घेतल्यास जास्त फायदा होतो.

  जवस+ हरभरा ः मध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस. ६ः३ किंवा ३ः३ ओळींच्या प्रमाणात घेतल्यास अधिक फायदा होतो.

बागायती आंतरपीक पद्धती   गहू+ हरभरा : मध्यम ते भारी जमिनीमध्ये ६ः३ ओळींच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धती घेतल्यास फायदा होतो.

 गहू+ मोहरी ः मध्यम ते भारी जमिनीमध्ये ६ ओळी गहू व ३ ओळी मोहरीची लागवड करावी.

पूर्वहंगामी उसात घ्यावयाची आंतरपिके     पूर्व हंगामी उसाची लागवड ऑक्‍टोबर - नोव्हेंबर या दरम्यान करतात. या उसामध्ये मुख्यत्वेकरून रब्बी हंगामात घेतली जाणारी पिके उदा. बटाटा, कांदा, लसूण, कोबी, फ्लॉवर इ. आंतरपीक घेतात. पट्टा अथवा जोड पद्धतीत (७५-१५० सेंमी) आंतरपिकाच्या २ ओळी घ्याव्यात.     पूर्व हंगामी+ कांदा : उसामध्ये कांद्याच्या रोपाची लागण सरीच्या दोन्ही बाजूस १० ते १५ सेंमी अंतरावर दुसऱ्या पाण्याच्या वेळी करावी.  

पूर्वहंगामी ऊस+ बटाटा  सलग लागवड पद्धत ः जमिनीच्या प्रकारानुसार उसाची लागवड ८० सेंमी १०० सेंमी व १२० सेंमी केली जाते. उसाची व बटाट्याची एका वेळी लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीवर प्रथम बटाटे १०० सेंमी अंतरावर सरळ रेषेमध्ये १५ ते २० सेंमी अंतरावर ठेवावे व त्यानंतर दोन बटाट्याच्या ओळीमधून रिजर चालवावा. जेणेकरून अंथरलेले बटाटे हे वरंब्याखाली आपोआप झाकले जातात. तसेच रिजरमुळे ऊस लागवडीसाठी सऱ्या तयार होतात आणि या सऱ्यामध्ये ऊस लागवड करता येते. उसात बटाटे आंतरपीक पद्धतीत सर्वसाधारणपणे बटाटा पिकांचे १५० ते २०० क्विंटल उत्पादन मिळते.  जोड ओळ पट्टा पद्धत ः २.५ फुटावर सलग सऱ्या पाडून दोन सऱ्यात उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडल्यास दोन जोड ओळीत ५ फुटांचा पट्टा तयार होतो. अशा पट्ट्यातच बटाटा, हरभरा किंवा कांदा यांची लागवड करावी.

संपर्क ः डॉ. वासुदेव नारखेडे, ९८२२९९२८६४ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Story: आठवणींची फुलवात...

El Nino Impact on Monsoon: एप्रिल महिन्यात पाऊस दणका देणार का?

Water Conservation: जल-सृष्टी व्यवस्थेचे जनकेंद्री पुनरुज्जीवन

Grain Storage Pest Management: धान्य साठवणुकीतील ‘लेसर ग्रेन बोरर’

Rural Education Programme: जैवविविधता, शिक्षणाशी जोडणारी मायेसा फाउंडेशन

SCROLL FOR NEXT