पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन 
 सां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत नुकत्याच आलेल्या महापुरात द्राक्ष बागा सापडल्या. या भागात सतत पाऊसही झाला, त्यामुळे द्राक्ष बागेत पाणी साचून राहिले. काही भागांत द्राक्षवेलींच्या वर ४-५ फूट पाणी जवळपास ११-१२ दिवस राहिले. त्यानंतर बागेतून पाणी निघून गेले. अशा द्राक्षवेलीमध्ये शरीरशास्त्रीय हालचाली, घडामोडी होत आहेत, त्या सद्यःस्थितीमध्ये परवडणाऱ्या नाहीत. काही बागेत द्राक्ष बाग पाण्यात नसली तरी सततच्या पावसामुळे बागेत काहीच कार्यवाही करणे शक्य झाले नाही. परिणामी, रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्याचे चित्र दिसत आहे. काही बागांमध्ये खालील प्रमाणे परिस्थिती असेल, त्यामध्ये बागेत पुढील कामे करावीत.   
 बागेत काहीच पाने शिल्लक नाहीत       ज्या द्राक्ष बागा १०-१२ दिवस पाण्यात होत्या. पाणी गेल्यानंतर वेलीवरील सर्व पाने सुकली. बागेतून पाणी निघून गेल्यानंतर आता तापमान वाढत असून, आर्द्रता १०० टक्क्यांपर्यंत आहे. ज्याप्रमाणे आपण रूटस्टॉकची काडी पिशवीत लावण्यापूर्वी २४ तास पाण्यात ठेवतो. बाहेर काढल्यानंतर काडीची जी अवस्था दिसते, त्याप्रमाणे या बागेतील काडीची अवस्था दिसते. या ठिकाणी काडीवर एकही पान शिल्लक नाही. काडीसुद्धा शेंड्यापर्यंत परिपक्व झाली आहे. अशा परिस्थितीत बागेत वाढत्या आर्द्रतेमध्ये डोळा फुटायला सुरुवात होते. साधारण परिस्थितीत शेंड्याकडील डोळा आधी फुटतो. मात्र बागेत काडीवरील सर्वच डोळे फुटताना दिसतील. अशा बागेत फळछाटणी लवकर घ्यावी. कारण बागेतील परिस्थिती एक आठवड्यानंतर छाटणी घेण्यायोग्य वाटत असली वातावरणामुळे दुसऱ्याच दिवशी काडीवरील डोळे कापसायला सुरुवात झालेली दिसेल. अशा बागेत सतत पाहणी करून बागेचा आढावा घेणे गरजेचे असेल. काडीवरील डोळे कापसायला सुरुवात झाल्यास फळछाटणी घेणे फायद्याचे राहील.    या बागेत नवीन फुटी लवकर आणि जोरात निघतील. काही कालावधीनंतर वाढ थांबलेली दिसेल. नदीतून आलेला गाळ ज्या बागेत गोळा झाला, त्या बागेत जुन्या बोदावर काही इंच चिकणमातीचा थर जमा झालेला असेल. हा मातीचा थर ऊन पडल्यानंतर कडक झाला तरी त्याखालील जुनी माती जास्त काळ ओलसर राहू शकते. म्हणून अशा बागेत माती मोकळी करून घ्यावी. जास्त काळ मुळे पाण्यात राहिल्यास ती काम करणार नाहीत. वेलीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्य नवीन फुटी निघण्यासाठी वापरले जाईल. मात्र पुढील काळात अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी मुळे कार्यरत करणे गरजेचे आहे.  
 बागेत पावसापूर्वी काडी परिपक्व झालेली नसल्यास 
 फक्त जोमदार पावसात अडकलेली द्राक्ष बाग