संकरित नेपिअर चारा पीक लागवड तंत्रज्ञान  
ॲग्रो गाईड

संकरित नेपिअर चारा पीक लागवड तंत्रज्ञान

सुधीर सूर्यगंध

संकरित नेपिअर हे बहुवार्षिक, भरपूर व चांगले उत्पन्न देणारे पुरवठ्याचे वैरणीचे पीक आहे. गवत उसासारखे उंच वाढते. या प्रथिनांचे प्रमाण ९ ते १० टक्के असते. महाराष्ट्रात याची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. 

जमीन :  काळ्या, गाळ्याच्या, मध्यम भारी जमिनीत हे पीक चांगले येते.

पूर्वमशागत :  जमिनीची खोल नांगरट करावी. कुळवाच्या दोन आडव्या-उभ्या पाळ्या घालून जमीन तयार करावी. नंतर २.५ × २.५ फूट खोल सऱ्या पाडून जमीन पेरणीसाठी तयार ठेवावी.

पेरणी :  खरिपात पेरणी जून ते ऑगस्टमध्ये आणि उन्हाळी हंगामात फेब्रुवारी - मार्च महिन्यात केल्यास उगवण चांगली होते. सऱ्यांमध्ये १ ते १.५ फूट अंतरावर ठोंबाची किंवा कांड्यांची लागण करावी. हेक्‍टरी २० ते २५ हजार ठोंब किंवा कांड्या लावाव्यात. सुधारित जाती :  यशवंत, फुले जयवंत या जातींची प्रामुख्याने लागवड करावी.

खते :  प्रतिहेक्‍टरी २० ते २५ बैलगाड्या शेणखत जमिनीत मिसळावे. ५० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, २० किलो पालाश पेरणीपूर्वी द्यावे, तसेच प्रत्येक कापणीनंतर २५ किलो नत्र प्रतिहेक्‍टरी द्यावे. आंतरमशागत :  या पिकाच्या प्रत्येक कापणीनंतर खुरपणी, भांगलण करून शेत तणविरहीत ठेवावे.

पाणी व्यवस्थापन :  पावसाचा ताण पडल्यास १० ते १५ दिवसांनी पाणी देण्याची सोय करावी.

उत्पादन :  पहिली कापणी ५०-६० दिवसांनी करावी. त्यानंतरच्या कापण्या ३० ते ४० दिवसांनी घ्याव्यात. कापणी करत असताना वितभर ठोंब ठेवून सर्व फुटी कापाव्यात. या पिकाचे वार्षिक हेक्‍टरी चारा उत्पादन २००० ते २५०० क्विंटल इतके मिळते.

हे लक्षात ठेवा :  हे गवत सलग शेताप्रमाणेच बांधावर लागवड करून घेता येते. पावसाळ्यात लागवड केल्यास जनावरांसाठी चांगली वैरण मिळू शकते.

संपर्क : सुधीर सूर्यगंध - ९८२२६११९३४

(लेखक डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे, जि. कोल्हापूर येथे विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन) आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT