पॉलिहाउसमध्ये भरत आहेर यांची ढोबळी मिरची लागवड. 
ॲग्रो गाईड

पॉलिहाउसमधून घेतो दर्जेदार ढोबळी मिरची

Santosh Munde

तेरा एकर शेती असलेले भरत अाहेर २०१२ पासून संरक्षित शेतीकडे वळले. पहिल्यांदा त्यांनी वीस गुंठे शेडनेट उभारून ढोबळी मिरचीची लागवड केली. त्यानंतर २०१३ मध्ये एक एकर, २०१४ मध्ये पुन्हा एक एकरात शेडनेट उभारले. यामध्ये त्यांनी ढोबळी मिरची आणि काकडी लागवडीचे नियोजन केले.  २०१५ मध्ये अाहेर यांनी  तीस गुठ्यांवर पॉलिहाउस उभारले. सध्या शेडनेटमध्ये काकडी, ढोबळी मिरची आणि पॉलिहाउसमध्ये ढोबळी मिरची लागवडीचे नियोजन ठेवले आहे.       शाश्वत पाणी नियोजनासाठी आहेर यांनी ३४ मीटर बाय ३४ मीटर बाय ३ मीटर आणि २० मीटर बाय १३ मीटर बाय ३ मीटर या आकाराची दोन शेततळी घेतली. या शेततळ्यात विहिरीतील पाणी भरून ठेवले जाते. पॉलिहाउसच्या छतावर पावसाळ्यात साचणारे पाणीदेखील त्यांनी शेततळ्यात सोडले आहे. आहेर यांनी बॅंकेचे कर्ज घेऊन तीस गुंठे क्षेत्रावर पॉलिहाउसची उभारणी केली होती. शासनाचे पन्नास टक्‍के अनुदान मिळाले तरी त्यांनी त्यांच्याकडे कर्जरूपात असलेल्या जवळपास अकरा लाख रुपये कर्जाची दोन वर्षांत परतफेड केली आहे.

पीक नियोजन 

  • स्वतः रोपनिर्मितीवर भर.
  • गादीवाफ्यात शेणखत, निमपेंड, रासायनिक खतांचा शिफारशीनुसार वापर.
  •  पीक वाढीच्या टप्प्यात ठिबक सिंचनाने खतांचे व्यवस्थापन.
  • एकात्मिक कीड, रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब.
  • शेडनेटमध्ये ढोबळी मिरची लागवड जून महिन्यात तर काकडी लागवड एप्रिल महिन्यात.
  • पॉलिहाउसमध्ये ढोबळी मिरची लागवड फेब्रुवारी महिन्यात.
  •  ढोबळी मिरचीचे लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांनी उत्पादन सुरू, जवळपास दहा महिने मिळते उत्पादन.
  • आठ ते दहा दिवसाला ढोबळी मिरचीचा तोडा, प्रतितोडा सरासरी १ ते २ टन उत्पादन. 
  •  एक एकर शेडनेटमधून ४५ टन काकडीचे, तर ढोबळी मिरचीचे ४० टन उत्पादन.
  • ३० गुंठे पॉलिहाउसमधून ३० टन ढोबळी मिरचीचे उत्पादन.
  •  ढोबळी मिरचीला मे, जून, जुलैमध्ये प्रति किलो ३० ते ४० रुपये दर, इतर वेळी सरासरी २० ते ३० रुपयांपर्यंत चढ उतार.
  • काकडीची व्यापाऱ्यांकडून १५ रुपये प्रति किलो दराने थेट खरेदी, सध्या ८ ते ९ रुपये प्रति किलो दर. 
  •  मुंबई, औरंगाबादच्या व्यापाऱ्यांकडून थेट खरेदी, काहीवेळा औरंगाबाद मार्केटमध्ये विक्रीचे नियोजन.
  • संपर्क ः भरत आहेर : ९५५२७३२७००  

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Bajara Cultivation: खानदेशात बाजरीची पेरणी सुरू; क्षेत्र स्थिर राहण्याचे संकेत

    Sugar MSP: साखर उद्योग अडचणीत, साखरेची 'एमएसपी' वाढणार का? सहकारमंत्र्यांचा महत्त्वाचा खुलासा

    Irrigation Projects: सिंचन प्रकल्पांच्या किमतींमध्ये सतत वाढ

    Akola Farmers Award: कृषिदिनी अकोला जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान

    Rain Udpate: मॉन्सूनची प्रगती सुरूच; कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा, उर्वरित राज्यात पाऊस हजेरी लावणार

    SCROLL FOR NEXT