तुडतुडे पालवी, मोहोरामधून रस शोषून घेतात.
तुडतुडे पालवी, मोहोरामधून रस शोषून घेतात.  
ॲग्रो गाईड

आंब्यावरील तुडतुडे, करपा रोगाचे नियंत्रण

डॉ. आनंद नरंगलकर, डॉ. अंबरीश सणस

सद्यःस्थितीत पावसाने उघडीप दिलेल्या भागात तापमान वाढ झाल्यामुळे सर्वत्र आंब्यावर मोठ्या प्रमाणावर पालवी येण्याची शक्‍यता आहे. ढगाळ वातावरण तसेच कमाल तापमानात वाढ होत असल्यामुळे आंब्यावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. तुडतुडे पानांवर, तसेच खोडाच्या भेगांमध्ये सुप्तावस्थेत असतात. सध्या पोषक हवामान निर्माण होत असल्याने प्रादुर्भाव होऊ शकतो. 

प्रादुर्भाव ः      पिले व प्रौढ कोवळ्या पालवीमधून, मोहोरामधून तसेच कोवळ्या फळांमधून रस शोषून घेतात. परिणामी मोहोर व लहान फळांची गळ होते. पिले तसेच मोठे तुडतुडे शरीरावाटे मधासारखा चिकटपदार्थ (खार) बाहेर टाकतात. हा चिकट पदार्थ आंब्याच्या पानावर तसेच झाडाखालील जमिनीवर पडतो. त्यावर काळ्या रंगाच्या कॅप्नोडीयम बुरशीची वाढ होते. पाने काळी पडतात, त्यामुळे झाडाच्या अन्न बनविण्याच्या क्रियेत अडथळा येऊन त्याचा झाडाच्या वाढीवर तसेच फळधारणेवर अनिष्ट परिणाम होतो.  नियंत्रण 

  • बागेत पुरेसा सूर्यप्रकाश राहील अशा प्रकारे फांद्याची विरळणी करावी. वेळोवेळी बागेचे सर्वेक्षण करून तुडतुडे पिलांच्या अवस्थेत असतानाच कीटकनाशकांची फवारणी करावी.
  •  कीटकनाशके फवारणी करतेवेळी त्यामध्ये योग्य प्रमाणात सर्फेक्टंटचा वापर करावा. 
  • कीटकनाशकांचा वापर ः   १) पहिली फवारणी ः (प्रतिलिटर पाणी)

  • पोपटी रंगाच्या पालवीवर मोहोर येण्यापूर्वी डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही)  ०.९ मि.लि.  
  •  फवारणीमुळे पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटींवर येणाऱ्या तुडतुड्यांपासून संरक्षण होते. 
  •  फवारणी पूर्ण झाड, खोड, फांद्या तसेच बागेलगत असलेल्या रायवळ आंब्याच्या झाडांवरही करावी. 
  • २) दुसरी फवारणी (बोंगे फुटताना)      लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि.

    बुरशीजन्य करपा रोग नियंत्रण

    रोगकारक बुरशी ः  कोलेटोट्रीकम ग्लोईओस्पोरिआॅइडस  लक्षणे ः  

  • पावसाळी वातावरण झाल्यास प्रादुर्भाव दिसतो. 
  • कोवळ्या पानांवर करड्या तपकिरी रंगाचे खोलगट आणि पिवळसर कडा असलेले डाग पडून वाढ खुंटते. 
  • पानावर चट्टे पडतात, पाने करपल्यासारखी दिसतात.
  •  मोहरावर बुरशीचा प्रादुर्भाव असल्यास तांबूस डाग पडून मोहोर वाळतो.
  • नियंत्रण ः       कार्बेन्डाझीम (१२ टक्के)  अधिक मॅन्कोझेब (६३ टक्के) संयुक्त बुरशीनाशक- १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी   संपर्क ः डॉ. आनंद नरंगलकर- ७०४५३७४१०६ (कृषी कीटकशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

    Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

    Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

    Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

    Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

    SCROLL FOR NEXT