gram cultivation
gram cultivation 
ॲग्रो गाईड

रुंद वरंबा सरी पद्धतीने हरभरा लागवड

डॉ. तुकेश सुरपाम

हरभरा लागवडीसाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो. यामुळे उत्पादनात वाढ होते.त्याचबरोबरीने लागवडीचा वेळ, मजुरी आदींमध्येही बचत  होते.  

हरभरा  पेरणी जमिनीत पुरेसा ओलावा असताना   करावी. पेरणीस जास्त उशीर झाल्यास आणि किमान तापमान खूपच कमी झाल्यास उगवण उशिरा आणि कमी होते. पिकाची वाढ कमी होऊन फांद्या, फुले व घाटे कमी लागतात. यासाठी कोरडवाहू तसेच बागायत हरभऱ्याची पेरणी वेळेवर करावी.  लागवडीच्या पद्धती

  • दोन सरीतील अंतर १५० सेंमी. ठेवावे. यामुळे १२० सेंमी अंतराचा रुंद वरंबा तयार होतो.
  • १२० सेंमी रुंदीच्या वरंब्यामुळे ३० सेंमी अंतरावर चार ओळीत लागवड करावी. 
  • जमिनीच्या प्रकारानुसार सरीची रुंदी कमी किंवा जास्त करता येऊ शकते.
  • अन्य पद्धत 

  • दोन सरीतील अंतर १२० सेंमी. ठेवावे. यामुळे ९० सेंमी रुंदीचा वरंबा तयार होतो. वरंब्यावर ३० सेंमी अंतरावर तीन ओळी घेता येतात. दोन्ही बाजूच्या सरी या गरजेनुसार ३० सेंमी किंवा कमी जास्त मिळू शकतात.
  • एका वरंब्यावर ४५ सेंमी अंतराच्या तीन ओळी घेण्यासाठी १३५ सेंमी रुंदीचा वरंबा तयार करावा. यासाठी दोन सरीतील अंतर १८० सें मी. ठेवण्यासाठी बीबीएफ यंत्र फाळाच्या (सरी) मध्य खुणेवर चालवावे. दोन्ही बाजूस पडणारी सरी ४५ सेंमी रुंदीची होते. 
  • फायदे

  • चांगली मशागत होऊन लागवडीसाठी गादीवाफे तयार होतात.
  • दोन ओळीतील आणि दोन रोपातील अंतर तसेच बियाण्यांची खोली शिफारशीनुसार ठेवता येते.
  • प्रति हेक्टरी अपेक्षित रोपांची संख्या मिळते.  
  • वरंब्यावर पीक असल्यामुळे पाणी आणि हवा यांचे योग्य संतुलन राखले जाते. पिकाला पुरेपूर सूर्यप्रकाश उपलब्ध होतो.
  • दोन्ही बाजूंनी असलेल्या सरीमुळे अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होते. तसेच कमी पाण्यामुळे मूलस्थानी जलसंधारण होण्यास मदत मिळते.
  • तणांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो.आंतरमशागत करणे सोयीचे होते.
  • बीबीएफ यंत्रामुळे रुंद वरंबा व सरी पाडणे, बियाण्यासोबत खत देणे, रासणी करणे शक्य होते. 
  • यंत्राच्या वापरामुळे बियाणे, वेळ, इंधन, मजुरीवरील खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होते. 
  •   - डॉ. तुकेश सुरपाम, ८६६८३९८७४९ (विषय विशेषज्ञ (कृषि अभियांत्रिकी),  कृषी विज्ञान केंद्र, खामगाव,जि.बीड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

    Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

    Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

    Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

    Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

    SCROLL FOR NEXT