karvand 
ॲग्रो गाईड

तंत्र करवंद लागवडीचे

करवंदाच्या भरपूर जाती आढळतात. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने निवड पद्धतीने कोकण बोल्ड ही उत्पादनाच्यादृष्टीने चांगली जात विकसित केली आहे.

माधुरी रेवणवार

करवंदाच्या भरपूर जाती आढळतात. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने निवड पद्धतीने कोकण बोल्ड ही उत्पादनाच्यादृष्टीने चांगली जात विकसित केली आहे.

सजीव कुंपण म्हणून करवंदाची फळबागेच्या कडेने लागवड करता येते. झाडाला काटे असतात. फळबागेच्या संरक्षणाबरोबर करवंदाच्या फळाचे उत्पादन मिळते. पावसाळ्यात करवंदाचे एक ते दीड वर्ष जुने रोपे लावल्यास वाढ चांगली होते. सुरुवातीच्या काळात रोपाला पाणी द्यावे लागते. त्यानंतर नैसर्गिकपणे याची जोपासना होते. करवंदाच्या भरपूर जाती आढळतात. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने निवड पद्धतीने कोकण बोल्ड ही उत्पादनाच्यादृष्टीने चांगली जात विकसित केली आहे.  

लागवडीचे तंत्र 

  • बांधावर ३ ते ५ फूट अंतरावर लागवड करावी. शेतात लागवड करायची असल्यास जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते ८ फुटांवर लागवड करावी. लागवडीसाठी १ फूट बाय १ फुटाचा खड्डा घ्यावा. त्यामध्ये माती व सेंद्रिय खत १:१ या प्रमाणात खड्डा भरून घ्यावा.
  • या पिकास विशेष खताची आवश्यकता नाही, परंतु फळ उत्पादनामध्ये सातत्य राहावे, यासाठी प्रति झाडास ५ किलो शेणखत दरवर्षी आळ्यात मिसळून द्यावे. 
  • लागवडीपासून तिसऱ्या वर्षापासून फळे लागायला सुरुवात होतात. सर्वसाधारणतः कोकणात जानेवारी, फेब्रुवारीमध्ये फुले येण्यास सुरुवात होते. फळे एप्रिल-मे मध्ये मिळतात. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात वळीवाचा पाऊस पडल्यानंतर म्हणजेच मे च्या शेवटी फुलधारणा व फलधारणा चालू होते. ही फळे जुलै, ऑगस्टमध्ये तयार होतात. फळे सुरुवातीला हिरवे, नंतर पिवळे व गर्द लाल होऊन काळी पडतात. अशी काळी फळे खाण्यासाठी योग्य असतात. हिरवी व लालसर फळे प्रक्रिया उद्योगामध्ये वापरतात.
  •  - माधुरी रेवणवार, ९४०३९६२०१४  (कृषी विज्ञान केंद्र, शारदा नगर, सगरोळी, जि. नांदेड) 

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Urad Sowing : शेतकऱ्यांनी उडीद पिकाखालील क्षेत्र वाढवावे

    Nashik Heavy Rain : पश्चिम पट्ट्यात घाटमाथ्यावर पावसाचा जोर

    Crop Compensation Scam : खातेदारांना दिली तुटपुंजी रक्कम अन् लाटला मलिदा

    Crop Demonstration : पीक प्रात्याक्षिक घटकासाठी शेतकरी गटांनी अर्ज करावेत

    Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ बाधितांच्या सर्व हरकती फेटाळल्या

    SCROLL FOR NEXT