हवामान सल्ला
हवामान सल्ला  
ॲग्रो गाईड

अवकाळी पावसाची शक्‍यता; तापमानात वाढ होईल

डॉ.रामचंद्र साबळे

म हाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे कमाल व किमान तापमानात वाढ होईल. यापुढील काळात तापमान वाढल्यामुळे उष्णता जाणवेल. बाष्पीभवनाचा वेग वाढेल. वाऱ्याची दिशा पूर्वेकडे राहील. मात्र, ३१ मार्च रोजी महाराष्ट्रात कमाल व किमान तापमानात वाढ होऊन तीव्र उन्हाळा जाणवेल. त्या वेळी हवेचा दाब १००८ हेप्टापास्कल इतके कमी होतील.  १ एप्रिल रोजी हवेचा दाब कमी झाल्याने अवकाळी व अवेळी पावसासाठी वातावरण तयार होईल.  वाऱ्याची दिशा दक्षिणेकडून उत्तरेकडे राहील. या संपूर्ण काळात हवामानात अस्थिरता येईल. अवकाळी, अवेळी वादळी वारे व पाऊस होण्याची शक्‍यता आहे. दिनांक ३१ मार्च, १ एप्रिल तसेच दिनांक ४ व ५ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भाचे काही भागांत पाऊस होईल. दिनांक ७ एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या पूर्वभागात पावसाची शक्‍यता आहे. कोकण ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील, तर सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस तर रायगड जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील, ठाणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ टक्के राहील. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ७७ टक्के राहील, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८० टक्के राहील.   उत्तर महाराष्ट्र  नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ४२ ते ४२ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. या आठवड्यात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २० ते २९ टक्के तर नाशिक जिल्ह्यात ३३ टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता या सर्वच जिल्ह्यांत ७ ते १० टक्के इतकी कमी राहील. मराठवाडा  हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल तर बीड व परभणी जिल्ह्यांत ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. पावसाची शक्‍यता राहील. बीड व परभणी जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता १५ टक्के राहील. जालना व हिंगोली जिल्ह्यांत १६ ते १७ टक्के इतकी कमी राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता १८ ते १९ टक्के राहील, तर औरंगाबाद जिल्ह्यात २० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ७ ते ११ टक्के राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र सोलापूर व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. पुणे जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस आणि सांगली व सातारा जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. सांगली व नगर जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस तर सातारा व पुणे जिल्ह्यांत १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. या जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६ टक्के राहील. सातारा जिल्ह्यात ६३ टक्के तर सांगली व पुणे जिल्ह्यांत ४३ ते ४६ टक्के राहील. तसेच सोलापूर व नगर जिल्ह्यांत २७ टक्के राहील. सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २५ टक्के राहील तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ८ ते १६ टक्के इतकी कमी राहील. हवामान कोरडे राहील. पश्‍चिम विदर्भ बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील, तर अकोला व नाशिक जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ११ ते १५ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७ ते ८ टक्के इतकी कमी राहील.  मध्य विदर्भ नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. नागपूर जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १७ ते २६ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७ ते ८ टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. पूर्व विदर्भ  चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ते ३६ ते ३८ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३० ते ३४ अंश टक्के राहील तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ४१ ते ५० टक्के राहील.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT