संकरित नेपिअर गवत
संकरित नेपिअर गवत  
ॲग्रो गाईड

नेपिअर गवताची लागवड

चारा पिके संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

सं करित नेपिअर या चारापिकाचे यशवंत आणि फुले जयवंत हे सुधारित वाण आहेत. यशवंत हा बहुवार्षिक, जास्त उत्पन्न देणारा आणि जायंट बाजरीचे गुणधर्म असलेला संकरित वाण आहे. या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. शक्‍यतो निचरा न होणारी, दलदलीची जमीन या पिकाच्या लागवडीसाठी टाळावी. खत व पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात दिल्यास या गवताची लागवड तीन वर्षांपर्यंत टिकते.

  • संकरित नेपिअर गवत बहुवार्षिक व भरपूर उत्पन्न देणारे असल्याने शेत तणविरहित ठेवावे. लागवडीपूर्वी उभ्या-आडव्या नांगरटी करून, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
  • खरीप हंगामात जून ते ऑगस्ट आणि उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च या महिन्यांत या गवताची लागवड करावी. याची लागवड ठोंबे मुळासह लावून करावी. तीन महिने वाढू दिलेल्या गवताचे खोडाचा जमिनीकडील दोन तृतीयांश भागातील दोन ते तीन डोळे असणाऱ्या कांड्या काढून लावल्यास त्या चांगल्या फुटतात. ठोंबे किंवा कांड्या ९० सें. मी. अंतरावरील सऱ्यांच्या बगलेत लावावेत. सरासरी दोन ठोंब्यांतील अंतर ९० x ६० सें. मी. ठेवून लागवड केल्यास आंतरमशागत करणे सुलभ जाते.
  • लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार प्रतिहेक्‍टरी ५० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, २० किलो पालाश द्यावे. त्यानंतर पीकवाढीचा जोम कायम राहण्यासाठी कापणीनंतर २५ किलो नत्र द्यावे.
  • गवताच्या सुरवातीस वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या देणे आवश्‍यक आहे, त्यानंतर गरजेनुसार खुरपणी अथवा खांदणी करावी.
  • उन्हाळी हंगामात (फेब्रुवारी ते मार्च) लागवड केल्यास गवताच्या उत्तम वाढीसाठी सुरवातीचे दोन व त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पावसाळ्यात (खरीप हंगामात) गरजेनुसार १२ दिवसांच्या अंतराने पाळ्या द्याव्यात, तसेच थंडीच्या दिवसांत १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • या गवताची कापणी लागवडीपासून दहा आठवड्यांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारण १५ ते २० सें. मी. उंचीवर करावी, त्यामुळे फुटवे फुटण्यास चांगली मदत होते. नंतरच्या कापण्या पीकवाढीनुसार सहा ते आठ आठवड्यांनी कराव्यात म्हणजेच सकस, रुचकर, पौष्टिक व रसरशीत चारा उपलब्ध होतो.
  • प्रतिवर्षी सात कापण्यांद्वारा १५०० क्विंटल चारा एक हेक्‍टरपासून मिळू शकतो.
  •  - ०२४२६- २३३२५६   चारा पिके संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

    Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

    Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

    Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

    SCROLL FOR NEXT