ज्वारीवरील खोडकिडा, रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
ज्वारीवरील खोडकिडा, रसशोषक किडींचा प्रादुर्भाव 
ॲग्रो गाईड

ज्वारीवरील खोडकिडा, रसशोषक किडींचा प्रादुर्भाव

रवींद्र मंचरे

कीडीमुळे ज्वारी पिकाचे सुमारे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. सध्याच्या काळामध्ये ज्वारी पिकामध्ये खोडकिडा, रसशोषक किडी, मीजमाशी याबरोबरच अमेरिकन लष्करी अळीचाही प्रादुर्भाव दिसत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात. खोडकिडा : प्रादुर्भाव ओळखण्याची खूण ः पोंग्यातील पानाच्या वर लहान लहान पारदर्शक व्रण आढळतात. कोवळ्या पानावर आडव्या रेषेत लहान-लहान छिद्रे पडलेली दिसतात. वाढणाऱ्या शेंड्याला इजा होऊन विशिष्ट प्रकारची पोंगामर होते. वेळ ः किडीचा प्रादुर्भाव साधारणतः पीक एक महिन्याचे झाल्यापासून कणसात दाणे भरण्याच्या स्थितीत जास्त असतो. आता बहुतांश ठिकाणी अळी ताटात शिरल्यानंतरची अवस्था शेतात असेल. या अवस्थेत अळी आतील गाभा खाते, त्यामुळे ताट आणि कणीस वाळते. व्यवस्थापन कीडग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. ट्रायकोग्रामा चिलोणीस या परोपजीवी कीटकांचे १.५० लाख प्रति हेक्टर - ३० ते ४० दिवसांनी दोनदा प्रसारण करावे. प्रति हेक्टरी एक प्रकाश सापळा लावावा. गावामध्ये मोठ्या प्रमाणात प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. आर्थिक नुकसान संकेत पातळी १० टक्के झाडांच्या पानावर छिद्रे किंवा ५ टक्के पोंगेमर झालेली झाडे. फवारणी प्रतिलिटर पाणी क्लोरपायरीफॉस (२०%) २.५ मिलि मावा : ज्वारीवर २ ते ३ प्रकारचे मावा दिसतात. १) एक मावा रंगाने निळसर हिरवा असतो; मात्र पाय काळे असतात. २) दुसऱ्या प्रकारचा मावा रंगाने पिवळसर असून, तो जुन्या पानांच्या खालच्या बाजूवर आढळून येतो. अनुकूल परिस्थितीत या माव्याची एक आठवड्यात एक पिढी पूर्ण होते. ३) हिरवा मावा पिकाच्या सुरवातीच्या काळात पोंग्यात दिसून येतो. पोंग्यातील रस शोषून घेतल्यामूळे पाने पिवळी पडून कालांतराने वाळतात. या किडीवर मोठ्या प्रमाणावर भक्षक भुंगेऱ्यांची वाढ होते. माव्याच्या शरीरातून बाहेर पडलेला गोडसर रस पानावर पसरतो. त्यावर काळी बुरशी वाढल्याने प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळे येतात. मावा किडीमुळे विषाणुजन्य रोगाचा प्रसारही होतो. तुडतुडे : तुडतुडे व त्याची पिले पोंग्याच्या पानातील रस शोषून घेतात. किडीद्वारे झालेल्या इजेमुळे पानातून रस बाहेर पडून पानावर त्याचे साखरेत रूपांतर होते. त्यामुळे पान चिकट होऊन त्यावर काळी बुरशी वाढते. त्याला चिकटा पडला, असे म्हणतात. किडीच्या प्रादुर्भावामुळे पाने पिवळी पडून झाडाची वाढ खुंटते व कणीस बाहेर पडत नाही. किडीचे प्रमाण जास्त झाल्यास वरची पाने पिवळी पडून वाळतात. नियंत्रण तुडतुडे व मावा यांचा प्रादुर्भाव आढळून येताच, फवारणी प्रतिलिटर डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १ मिलि किंवा थायामेथोक्झाम (२५ टक्के दाणेदार) ०.३ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मिलि मीजमाशी :

  • माशी आकाराने लहान असून, तिचा पोटाकडचा भाग नारंगी व पंख पारदर्शक असतात.
  • तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस, हवेतील आर्द्रता ६० टक्क्यांपेक्षा जास्त अशा वातावरणात अळ्या सुप्तावस्थेतून बाहेर येतात. मादी माशी फुलावर तसेच परिपक्व होणाऱ्या कणसातील दाण्यावर अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी फुलातील बीजांडकोशावर उपजीविका करते. परिणामी कणसात दाणे भरत नाहीत. या किडीमुळे उत्पादनात ६० टक्के घट येते.
  • नियंत्रण २० अळ्या प्रतिकणीस दिसल्यास, फवारणी प्रतिलिटर क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. किंवा क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) २.५ मि.लि. टीप ः फवारणी सकाळी लवकर करावी. आवश्यकतेनुसार पुढील फवारणी ५ दिवसांनी करावी. अमेरिकन लष्करी अळी (स्पोडोप्टेरा फ्रुगीपेर्डा) : या अळीचा आपल्याकडे नव्यानेच मका, ऊस पिकावर प्रादुर्भाव दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज परिसरामध्ये मका, ऊस या पिकाशेजारील ज्वारीच्या शेतावर काही प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. या अळीची नुकसानकारकता लक्षात घेऊन नियंत्रणाचे त्वरित उपाय करावेत. नियंत्रण ट्रायकोकार्ड ५ ते ७ कार्ड प्रतिहेक्टरी बीटी (बॅसिलस थुरीन्जीएन्सीस), नोमुरिया रिलाय या जैविक कीटकनाशकांची हेक्टरी ५०० लिटर पाण्यामध्ये ७०० ग्रॅम याप्रमाणे फवारणी करावी. किंवा थायोमिथॉक्झाम (१२.६ टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५ टक्के झेडसी) १२५ मि.लि. प्रतिहेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संपर्क ः रवींद्र मंचरे, ९९७५५४०३३१ (सहायक प्राध्यापक, कृषी कीटकशास्र विभाग, लोकमंगल कृषी महाविद्यालय, वडाळा, सोलापूर.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

    Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

    Cotton Market : कापूस का काळवंडला?

    Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

    Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

    SCROLL FOR NEXT