बायोडायनॅमिक शेती पद्धतीचे महत्त्व, मर्यादा
बायोडायनॅमिक शेती पद्धतीचे महत्त्व, मर्यादा 
ॲग्रो गाईड

बायोडायनॅमिक शेती पद्धतीचे महत्त्व, मर्यादा

डॉ. आनंद सोळंके, विजय पाटील

बायोडायनामीक शेती पद्धतीचे उद्गाते डॉ. रुडॉल्फ स्टेईनर हे जर्मनी येथील तत्त्वज्ञान विषयाचे अभ्यासक होते. त्यांनी हिंदू, बौद्ध आणि वैदिक सिद्धांताच्या अभ्यासातून १९२२ मध्ये बायोडायनॅमिक शेतीचा विचार मांडला. या सिद्धांतानुसार, पृथ्वी ही त्यावरील सर्व जीव आणि जंतूंचा आपल्या शक्तीद्वारे प्रतिपाळ करते. त्या विश्व-शक्तीचा किंवा ऐहिक शक्तीचा (Cosmic Energy) परिणाम पृथ्वी, जमीन, प्राणीमात्र, वनस्पती, जीवजंतू, वातावरण इत्यादी सर्व घटकांवर सारखा होत असतो. ही क्रिया निरंतर स्वरूपाची आहे. डॉ. रुडॉल्फ स्टेइनर यांच्या अनुयायांनी या तत्त्वानुसार अनेक प्रयोग केले. त्यातून कृषी क्षेत्रात चैतन्यमयी जैवपदार्थाच्या (Biodynamic Preparations) उपयोगातून सेंद्रिय पदार्थ, माती व ऐहिक शक्ती यांच्या माध्यमातून अनेक लाभदायक बदल घडवणे शक्य असल्याचे दाखवले. परिणामी उत्तम दर्जाचे कृषी उत्पादन व पर्यावरणाचे संतुलन दोन्हीही सांभाळणे शक्य होते.  बायोडायनॅमिक कृषी पद्धती मुख्यत: खालील तत्त्वांवर आधारित आहे.

  • निसर्गातील मूलभूत तत्त्वांना मान्यता
  • जमिनीची सुपीकता व संतुलनाकरिता ऐहिक शक्तीचा उपयोग. अवकाशातील ऐहिक शक्तीचा कालनियोजित परिणाम साधणे.
  • ऐहिक शक्तीचे होणारे परिणाम सेंद्रिय पदार्थ, खनिज पदार्थ, बी-बियाणे, लागवड, पेरणी, जमिनीची मशागत, रोपांचे स्थानांतर, कापणी, छाटणी, बुरशी नियंत्रण, कीटक व रोग नियंत्रण व तण नियंत्रण अशा महत्त्वाच्या कृषी प्रक्रियेत उपयुक्त ठरतात. त्याचा वापर करण्याचे तंत्र विकसित करणे.
  • पेरणी /लागवड तंत्रात चंद्रकला व राशीस्थानाचे महत्त्व लक्षात घेणे.  
  • बायोडायनॅमिक कृषी पद्धतीचे फायदे

  • पिके अधिक प्रथिने व जीवनसत्व असलेली उत्पादीत होत असल्याचा दावा केला जातो.
  • पिकांचे उत्पादन सरसरी उत्पादनापेक्षा जास्त मिळते.
  • या पद्धतीत कीटक व रोगाच्या नियंत्रणाविषयी संपूर्ण नसले तरी त्यांचा प्रादुर्भाव अत्यंत अल्प असल्याचे ही पद्धती वापरणाऱ्या शेतकऱ्यांचे मत आहे.
  • या मर्यादांमुळे पद्धतीचा होतो कमी वापर ः
  • बायोडायनॅमिक पद्धती मनुष्य स्वभावाशी संबंधित असून, शेती विषयक प्रश्नांशी स्पष्टपणे निगडित नाही.
  • मनुष्य स्वभाव व जुन्या कल्पना बदलणे अवघड ठरते.
  • या पद्धतीत केवळ नत्र, स्फुरद, पालाश याचा विचार केलेला नसून, जैविक संतुलनाचा विचार केला जातो.
  • या शेती पद्धतीविषयीची माहिती शेतकऱ्यांपर्यत पोचण्यामध्ये अडचणी व अडथळे आहेत.
  • संपर्क :  विजय पाटील, ९१५८९८९८५८ ( डॉ. आनंद सोळंके हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषी विद्या विभागाचे प्रमुख असून, विजय पाटील हे आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

    Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

    Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

    Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

    Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

    SCROLL FOR NEXT