डाळिंबावरील तेलकट डाग रोग  
ॲग्रो गाईड

डाळिंब सल्ला

डॉ. सचिन हिरे

हस्त बहर बागांचे व्यवस्थापन :

  • छाटलेल्या, रोगट फांद्या, फळे जाळून नष्ट कराव्यात.    
  • बागेला चांगल्या प्रतीचे ६ ते ८ सामू व १ डीसीएमचा वजा १ घातपेक्षा कमी विद्युतधारकता असणारे १७ ते १८ लिटर पाणी प्रतिझाड, प्रतिदिवस द्यावे.
  • फळे पेरूच्या आकाराची असताना प्रतिझाड २०० ग्रॅम १९:१९:१९ आणि २०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश या खतांची मात्रा द्यावी.
  • फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ०.२५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
  • खोडकिडीच्या नियंत्रणासाठी छिद्रांमध्ये इंजेक्शनद्वारे क्लोरपायरीफॉस १० मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून हे द्रावण छिद्रामध्ये सोडावे आणि छिद्रे बंद करावीत.
  • ढगाळ वातावरणात ८ ते १० दिवसांच्या अंतराने गरजेनुसार ब्रोमोपॉल (२ ब्रोमो २ नायट्रोप्रोपेन १,३ डायोल) २५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • फळे लिंबू ते पेरू आकाराची असतानाच ०.५ टक्का बोर्डो मिश्रणाची (५०० ग्रॅम अधिक ५०० मोरचूद प्रति १०० लिटर पाणी) फवारणी घ्यावी.
  • बाग फुलो­रा अवस्थेत असताना बोर्डो मिश्रणाची फवारणी टाळावी.
  • बागेत जमिनीवर ४ टक्के कॉपर डस्ट  ८ किलो किंवा ब्लिचिंग पावडर २०-२५ किलो प्रतिएकरी या प्रमाणात धुरळणी करावी किंवा बागेमध्ये १ टक्का बोर्डो मिश्रणाची (१ किलो चुना अधिक १ किलो मोरचूद प्रति १०० लिटर पाणी) जमिनीवर फवारणी करावी.
  • तापमान कमी असताना करावयाच्या उपाययोजना :

  • बागेला रात्रीच्या वेळी पाणी द्यावे.बागेत योग्य तापमान राखण्यासाठी बागेभोवती काडीकचरा व गवत जाळून धूर करावा.
  • सद्यस्थितीत उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मध्य महाराष्ट्रातील तापमानात मोठी घट झाली आहे. अशावेळी झाडांचे थंड वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी बागेच्या चोहोबाजूंनी शेडनेट किंवा उपलब्ध गोणपाटाचा वापर करुरून वारा प्रतिबंधक कुंपणाची उभारणी करावी.
  • संपर्क :डॉ. सचिन हिरे , ७६९८५३६८७३ (डाळिंब संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसार केंद्र, लखमापूर, जि. नाशिक)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

    Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

    Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

    Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

    Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

    SCROLL FOR NEXT