आंबा पिकावरील लाल कोळी व त्याने केलेले नुकसान
आंबा पिकावरील लाल कोळी व त्याने केलेले नुकसान  
ॲग्रो गाईड

आंबा पालवीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

डॉ. अंबरीश सणस, डॉ. विजयकुमार देसाई

सर्वसाधारणपणे आंबा पिकामधे नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून तुरळक प्रमाणात मोहोर येण्यास सुरवात होते. डिसेंबर-जानेवारी महिन्यात बागेमध्ये मोठ्या प्रमाणात मोहोर येण्यास सुरवात होते. सर्वसाधारणपणे पावसाळा संपल्यानंतर बागांची साफसफाई केली जाते. त्यात बागेमधील दाट वाढलेल्या आंबा झाडांच्या फांद्याची विरळणी करावी. झाडामध्ये पुरेसा प्रकाश पडून, हवा खेळती राहील, याकडे लक्ष दिल्यास कीड व रोग यांच्या वाढीस आळा बसतो. विरळणीनंतर आंब्यावर किडी किंवा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसल्यानंतरच फवारणीचे नियोजन करावे. आंब्याच्या पालवीवर प्रामुख्याने खालील किडी येतात.

तुडतुडे : नुकसानीचा प्रकार : पिले व प्रौढ आंब्याचा मोहोर, कोवळी पालवी, कोवळी फळे यातून रस शोषतात. परिणामी मोहोर व लहान फळांची गळ होते. तुडतुड्याच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या मधासारख्या चिकट पदार्थावर काळ्या रंगाच्या (कॅपनोडीयम) बुरशीची वाढ होते. पाने काळी पडतात. (यालाच स्थानिक भाषेत ‘खार पडणे’ असे म्हटले जाते.) नियंत्रण व्यवस्थापन :

  • बागेत पुरेसा सूर्यप्रकाश राहील अशा प्रकारे फांद्याची विरळणी करावी.
  • वेळोवेळी बागेचे सर्वेक्षण करून तुडतुडे पिलांच्या अवस्थेत असतानाच कीटकनाशकांची फवारणी करावी.
  • फवारणी प्रतिलिटर पाणी : डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) ०.९ मिली
  • फवारणी वेळ- मोहोर येण्यापूर्वी (सध्याची वेळ अत्यंत योग्य).
  • बागेतील हापूस, रायवळ अशा सर्व झाडे व त्यांच्या खोडावर फवारणी करावी. खोडांवरील सुप्तावस्थेतील तुडतुड्यांचे नियंत्रण होईल.

  • ब्युप्रोफेझिन (२५ टक्के प्रवाही) २ मिली किंवा
  • डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १ मिली किंवा
  • इमिडाक्‍लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मिली किंवा
  • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मिली किंवा
  • ऑक्‍सिडिमेटॉन मिथिल (२५ टक्के प्रवाही) २ मिली किंवा
  • थायामेथॉक्‍झाम (२५ टक्के डब्ल्यूडीजी) ०.१ ग्रॅम
  • फवारणी वेळ - बोंगे फुटताना.
  • पुढील फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कीटकनाशक बदलून तीन वेळा करण्याची शिफारस आहे.
  • फुलकिडे : नुकसानीचा प्रकार :  पिले व प्रौढ फुलकिडे पानाची साल खरवडून पानातील रस शोषतात. पानांच्या कडा तसेच शेंडे करपतात. पाने वेडीवाकडी होतात. अधिक प्रादुर्भावामध्ये पानगळ होऊन शेंडे शिल्लक राहतात. कोवळ्या फळांवरील साल खरवडल्यामुळे काळपट तांबूस किंवा विटकरी रंगाची होते.

  • पालवीवरील फुलकिडींच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी डायमेथोएट (३० टक्के प्रवाही ) १.५ मिली
  • फळांवरील फुलकिडींच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी स्पिनोसॅड (४५ टक्के प्रवाही) ०.२५ मिली किंवा थायोमेथॉक्‍झाम (२५ टक्के) ०.२ ग्रॅम.
  • मिजमाशी : नुकसानीचा प्रकार :

  • प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर, मोहोरावर, तसेच लहान फळांवर आढळतो.
  • मादी माशी सालीच्या आतमध्ये अंडी घालते. अळ्या बाहेर पडल्यानंतर पेशींवर आपली उपजीविका करतात. परिणामी त्या ठिकाणी बारीक, फुगीर, गाठ तयार होते. पूर्ण वाढलेली अळी गाठीला छिद्र पाडून जमिनीवर पडते. शेंडे जळतात. त्यामुळे मोहोरदेखील गळतो किंवा वाळतो. मोहोराची दांडी वेडीवाकडी होते.
  • लहान फळांवर प्रादुर्भाव झाल्यावर वाटाण्याच्या आकाराची फळाची गळ होते.
  • मिजमाशीच्या नियंत्रणासाठी :

  • अळ्या जमिनीत असल्यामुळे झाडाखालची जमीन उकरून त्यात शिफारशीत दाणेदार कीटक मिसळावे.
  • झाडाखाली काळे प्लॅस्टिक अंथरून घ्यावे. कोषावस्थेत जाणाऱ्या अळ्या प्लॅस्टिकवर पडतात. जमिनीत जाता न आल्याने मरतात.
  • शेंडा पोखरणारी अळी : नुकसानीचा प्रकार :

  • अळी पालवीच्या तसेच मोहोराच्या दांड्याला छिद्र पाडून आत शिरते व आतील भाग पोखरून खाते.
  • कीडग्रस्त फांदी तसेच मोहोर सुकून जातो. फांद्यावर गाठी निर्माण होतात व अशा फांद्या अशक्त राहतात.
  • किडीच्या नियंत्रणासाठी :

  • सुरवातीस प्रादुर्भाव कमी असताना कीडग्रस्त पालवी किंवा मोहोर किडीच्या अवस्थेसह काढून नष्ट करावेत.
  • फवारणी प्रतिलिटर पाणी डायक्‍लोरव्हॉस (७६ टक्के प्रवाही) १ मिली.
  • लाल कोळी : नुकसानीचा प्रकार :

  • लाल रंगाचे आकाराने अतिशय लहान कोळी उघड्या डोळ्यांना सहजासहजी दिसत नाहीत. पानांमागे त्यांनी बनवलेली बारीक जाळी दिसतात. जाळीखाली राहून पानातील रस शोषतात. पाने तेलकट, तांबूस होऊन अर्धवट वाळतात. नंतर भरपूर पानगळ होते.
  • लाल कोळीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी पाण्यात मिसळणारे गंधक (८० टक्के भुकटी) २ ग्रॅम अथवा डायकोफॉल २ मिली.
  • संपर्क :  डॉ. विजयकुमार देसाई, ९४०३६४१११६ (कृषी कीटकशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

    टीप : केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे सन २०२० पासून डायक्लोरव्हाॅसच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मानवी आरोग्य, पर्यावरण आणि जलस्रोतावर परिणाम होणार नाही, यादृष्टीने याचा वापर करावा. उत्पादनाच्या लेबलवरील शिफारशींचा काटेकोर वापर करावा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

    Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

    Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

    Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

    Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

    SCROLL FOR NEXT