सर्वच द्राक्षविभागामध्ये वातावरण पुढील आठ दिवस सर्वसाधारणपणे निरभ्र राहील. थंडीमध्ये चढ उतार राहील.
पुणे व जुन्नर भागामध्ये ते सर्वात थंड राहील. येथे एक दोन दिवस रात्रीचे तापमान ९ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत कमी राहून, पुढे काही दिवस १२ ते १३ अंशापर्यंत थोडे वाढण्याची शक्यता आहे.
भुरीबाबत सतर्कता आवश्यक ः सध्याच्या परिस्थितीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढण्याची शक्यता कमी दिसते. तरीसुद्धा भुरीच्या नियंत्रणाबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. ढगाळ वातावरणामध्ये भुरी वेगाने वाढते. ढगाळ वातावरण होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी भुरीच्या नियंत्रणासाठी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. भुरीच्या नियंत्रणासाठी जैविक नियंत्रणाचा वापर अधूनमधून करावा. शक्य तो आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर कमी करावा. त्याऐवजी सल्फर (८० डब्ल्यूजी) दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर किंवा जैविक नियंत्रक घटकांची (उदा. अॅम्पिलोमायसीस किंवा ट्रायकोडर्मा ५ मि.लि प्रति लिटर या प्रमाणात) फवारणी करावी. सल्फरची फवारणी व जैविक नियंत्रण घटकांची फवारणी पाच दिवसाच्या अंतराने घेतल्यास सध्याच्या वातावरणात भुरीचे नियंत्रण चांगले मिळू शकेल. मणी सुकणे व अन्य समस्या ः बऱ्याच ठिकाणी बागेमध्ये घडावरील मणी वाढण्याच्या अवस्थेत मणी सुकणे किंवा उकड्यासारखे प्रकार दिसून येत आहेत. आमच्या माहितीप्रमाणे अशा प्रकारची लक्षणे कुठल्याही बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होत नाहीत. बागेमध्ये रात्रीचे तापमान फार कमी झाल्यास, त्याचा परिणाम मण्यांवर होतो.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.