Salam Kisan Agrowon
ॲग्रो गाईड

Foxtail Millet Crop : कमी पावसात, कमी कालावधीत येणारे राळा पिकाचे नवीन वाण

Team Agrowon

Millet Year : युनोने यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केलंय.  देशात तृणधान्य क्षेत्र वाढीसह दुर्मिळ होत असलेल्या तृणधान्याची जपवणूक, त्यासबंधीचे मार्केट याबाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी कृषी विभागाकडून माहिती, अभियान व जनजागृती केली जात आहे. महाराष्ट्रात विदर्भ विभागांतर्गत येत असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा तर्फे शेतकऱ्यांमध्ये भरडधान्याविषयी जनजागृती केली जात आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तृणधान्याची लागवड करावी यासाठी शेतकऱ्यांना तृणधान्याच्या जाती, लागवड पद्धती विषयी  विद्यापीठातर्फे मार्गदर्शन केले जात आहे. विद्यापीठाने यंदा राळा या तृणधान्याच नवीन वाण विकसीत केल आहे. याशिवाय विद्यापीठात बेकरी पदार्थात विविध तृणधान्यांचा वापर करुन पौष्टिक  बेकरी पदार्थांची निर्मिती केली जात आहे. 

लघू तृणधान्य पिकांत प्रामुख्याने राळा, वरई, बर्टी, नाचणी, कोडो, बाजरी ही पिके दुर्लक्षित झाले आहेत. वास्तविक या पिकांतील पौष्टिक मूल्यांचा विचार करता सध्याच्या परिस्थितीत उत्तम आरोग्य व आहारविषयक जनजागृतीमुळे या पिकांचे महत्त्व कायम आहे. या भरधान्यापैकी राळा हे एक महत्वाच भरडधान्य आहे. अनेक वर्षांपूर्वी आहारामध्ये मुख्य अन्न म्हणून या पिकाचा समावेश होता. जगातील एकूण पौष्टिक तृणधान्य उत्पादनामध्ये राळा पीक दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही हे पीक स्वत:ला वाचवू शकत. मॉन्सूनचे आगमन उशिरा झाल्यास आकस्मित पीक नियोजनात या पिकाला भरपूर वाव असल्याचं तज्ज्ञांकडून सांगीतल जात आहे. खरीप, रब्बी, तसेच उन्हाळी अशा तीनही हंगामांत हे पीक घेता येत. 

तर अशा या राळा पिकाचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या बुलडाणा येथील संशोधन केंद्रावर राज्यात पहिल्यांदाच पीडीकेव्ही यशश्री हे नविन वाण विकसित झाले आहे. राळ्याचे हे वाण सध्याच्या इतर वाणांच्या तुलनेत लवकर येणारं आहे. त्यामुळे कमी कालावधीचे हे राळ्याच वाण फायदेशिर ठरु शकतं.  

राळा पिकास भादली, जर्मन मिलेट असेही म्हटले जाते. राळा पिकाचे कणीस झुपकेदार असते. पक्वतेच्या वेळेस कोल्ह्याच्या शेपटी सारखे अर्धगोलाकार होते. म्हणून या पिकाला इंग्रजीमध्ये फॉक्सटेल मिलेट असेही म्हणतात. सध्या देशात असलेल्या वाणपरत्वे या पिकाचा कालावधी ७० ते १३० दिवसांचा आहे. राळा पीक ५०० ते ७५० मिलिमीटरपर्यंत पावसाच्या क्षेत्रात येऊ शकत. या पिकात विविध प्रकारच्या जमिनीमध्ये तग धरून राहण्याची क्षमता आहे. खरीप हंगामामध्ये जुलैमध्ये तिसऱ्या आठवड्यापर्यंत राळा पिकाची पेरणी करता येते. हेक्टरी ५ ते ७ किलो या प्रमाणात बियाणे पेरण्याची शिफारस आहे. याच राळा पिकाचा राज्यातील पहिला वाण पीडीकेव्ही यशश्री डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत नुकताच प्रसारित करण्यात आला आहे. या पिकापासून हेक्टरी १५ ते १८ क्विंटल उत्पादन मिळते. तसेच कडब्याचे २० ते ४० क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन आहे.

आता पाहुया राळ्याच्या पीडीकेव्ही यशश्री या वाणाचे गुणधर्म काय आहेत ते... 

पीडीकेव्ही यशश्री या राळा वाणाची धान्य उत्पादन क्षमता हेक्टरी २३.३४ क्विंटल असून, राष्ट्रीय तुल्य वाण लेपाक्षी पेक्षा जास्त आहे. या वाणाचे दाणे मध्यम टपोरे आहेत. रंग आकर्षक फिक्कट पिवळसर आहे. हा वाण ८१ -८५ दिवस इतक्या कमी कालावधीत पक्व होतो. या वाणाचे कणीस घट्ट असून, त्यावर फुलोरा काळात केस असतात. हा वाण करपा आणि तांबेरा रोगास सहनशील आहे. यंदाच्या ‘जॉइंट अॅग्रेस्को’मध्ये राळ्याचं हे वाण प्रसारित झाला आहे. या वाणाचा कालावधी अत्यंत कमी दिवसांचा असल्यामुळे या पीकाच्या सध्याच्या परिस्थितीत लागवड करावी अशी शिफारस केली जात आहे.  त्यामुळे ज्या ठिकाणी कमी पाऊस आहे आणि उशीरा पावसाला सुरुवात झाली आहे. अशा ठिकाणी हे वाण फायदेशिर ठरु शकतं.  

-----------------

माहिती आणि संशोधन - डॉ. दिनेश कानवडे, पैदासकार, पंदेकृवि संशोधन केंद्र, बुलडाणा

(An initiative by Salam Kisan.)

(सलाम किसान हे सुपर अॅप असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सेवा व उत्पादने उपलब्ध करून दिली जातात.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT