Election Agrowon
ॲग्रो विशेष

ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी वेगाने सुरू

Local Body Election : जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे. जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत सोमवारी २१ जुलैपर्यंत ९२ तक्रारी दाखल झाल्या होत्या. या हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली असून सोमवारी (ता. १८) अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून झाल्या नाहीत. पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वाच्या मानल्या जातात. आता निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले असून त्या दृष्टीने प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.

प्रारूप प्रभाग रचना जाहीर करताना जिल्हा परिषदेचे ७५ व पंचायत समितीचे १५० गणांमध्ये समाविष्ट असलेल्या गावांची नावे व नकाशे जाहीर करण्यात आले होते. जिल्ह्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या रचनेवर ९२ हरकती दाखल झाल्या होत्या. जामखेड तालुक्यात सर्वाधिक ४४ हरकतींचा समावेश होता.

त्याखालोखाल पारनेरमध्ये १५, अकोले १०, नगर ८, संगमनेर ५, कर्जत ४, कोपरगाव आणि राहाता ३, श्रीगोंदे, नगर जिल्हाधिकारी कार्यालय १, शेवगाव आणि राहुरी तालुक्यात प्रत्येकी १ अशा हरकती दाखल झाल्या होत्या. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांतून गाव वगळणे, तसेच नव्याने गावांचा समावेश करणे, अशाच स्वरूपाच्या हरकतींची संख्या सर्वाधिक आहेत.

या निवडणुका २०११ च्या लोकसंख्येवर आधारित आहेत. तालुक्याच्या उत्तर दिशेने गट-गणांची रचना आहे. त्यानंतर पूर्व-पश्चिम आणि सर्वांत शेवटी दक्षिण भागातील गट-गणांची रचना इंग्लिश ‘झेड’ अक्षराप्रमाणे करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने १४ जुलैला जिल्ह्यातील गट आणि गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती.

आरक्षणाकडे लागले लक्ष

ग्रामीण भागात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत. प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांवर सुनावणी होऊन ११ ऑगस्टपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे.

१८ ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सादर केली जाणार आहे. याच दिवशी जिल्ह्यातील गट आणि गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. ही प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर गट आणि गणाचे आरक्षण जाहीर होणार आहे. या आरक्षणाकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT