Zilla Parishad Agrowon
ॲग्रो विशेष

Akola Zilla Parishad : अकोला ‘झेडपी’ विषय समिती सभापतीपदांचा निकाल जाहीर

जिल्हा परिषदेच्या पिंपळखुटा गटातील शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा परिषद सदस्या लता पंजाब पवार यांनी विहीत मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांच्याविरुद्ध अमरावती विभागीय आयुक्तांनी अपात्रतेची कारवाई केली होती.

टीम अॅग्रोवन.

अकोला ः जिल्हा परिषदेच्या पिंपळखुटा गटातील शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा परिषद सदस्या लता पंजाब पवार यांनी विहीत मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र (Cast Validity) सादर न केल्याने त्यांच्याविरुद्ध अमरावती विभागीय आयुक्तांनी अपात्रतेची कारवाई केली होती. त्यामुळे सभापतीपदाचा रोखलेला निकाल जाहीर करण्यात आला आहे. चारी पदांवर वंचित बहुजन आघाडीचे सदस्य निवडून आले आहेत.

जिल्हा परिषद सभापती निवडीच्या एक दिवस आधीच ही कारवाई झाल्याने या विषयाविरुद्ध लता पवार यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. याचिकेवर मंगळवारी (ता. एक) सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने पवार यांना दिलासा दिला असून अपात्रता प्रकरणी नव्याने सुनावणीचे विभागीय आयुक्तांना आदेश दिले आहेत. यासंदर्भात न्यायालयाकडून स्पष्ट निर्देश मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेत २९ ऑक्टोबरला चार सभापतिपदांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत मतदानादरम्यान भाजपच्या पाच सदस्यांपैकी तीन सदस्यांनी महाविकास आघाडी तर दोन सदस्यांनी वंचितच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे जिल्हा परिषदेत सभापतिपदाच्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांना सर्वाधिक मते मिळाली. या निवडणुकीच्या एक दिवसआधी म्हणजेच २८ ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांनी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या लता पवार यांना जातवैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे त्यांना अपात्र घोषित केले होते.

नव्याने सुनावणीचे आदेश

विभागीय आयुक्तांच्या अपात्रतेच्या निर्णयाला लता पवार यांनी नागपूर खंडपीठात आव्हान दिले. न्यायालयाने पवार यांना सभापतिपदाच्या निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्याचे आदेश दिले होते. त्यासोबतच सभापतिपदाच्या निवडणुकीचा निकाल राखून ठेवण्याचे आदेशही दिले आहोते. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी (ता. १) न्यायालयात पार पडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने लता पवार यांना दिलासा देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Linking Issue: दोघे भाऊ, मिळून खाऊ

Tiger Attack: चंद्रपूर जिल्ह्यात वर्षभरात वाघाच्या हल्ल्यात ४७ बळी

Digital Village: डिजिटल भूगाव आता एका क्लिकवर

Mumbai Muncipal Election: मुंबईसाठी रिपब्लिकन पक्षाचा स्वबळाचा नारा

Soybean Procurement: नारायणगावात ३५८ टन सोयाबीन खरेदी

SCROLL FOR NEXT